एक्स्प्लोर

Father's Day 2024: फादर्स डे निमित्त अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली... 

Virat Kohli Father's Day: विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं फादर्स डे निमित्त एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये विराट कोहलीला देखील टॅग करण्यात आलं आहे. 

न्यूयॉर्क : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळतोय. विराट कोहलीला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करता आलेली नाही. ग्रुप स्टेजच्या मॅचेसमध्ये त्याला केवळ 5 धावा करता आल्या आहेत. या पार्श्भूमीवर विराट कोहलीला पत्नी अनुष्का शर्मानं फादर्स डे ( Father's Day 2024 ) निमित्त खास गिफ्ट दिलं आहे. अनुष्का शर्मानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यास तिनं कोहलीला टॅग करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

अनुष्का शर्मानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एका पेंटिंगचा फोटो आहे. त्यातील पेपरवर पाय रेखाटण्यात आले आहेत. एक मोठ्या व्यक्तीचा पाय आणि लहान मुलाचा पाय त्यामध्ये रेखाटण्यात आला आहे. यासह हॅप्पी फादर्स डे असं लिहिण्यात आलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माला वामिका आणि मुलगा अकाय अशी दोन मुलं आहेत. अनुष्का शर्माच्या पोस्टवर चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहते अनुष्का शर्माच्या पोस्टला लाईक करत आहेत. अनुष्का शर्मानं पोस्ट शेअर केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात चार लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी तिची पोस्ट लाईक केली होती.  

अनुष्का शर्मानं बॉलिवूड मधून ब्रेक घेतल्याचं चित्र आहे. विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर ती कुटुंबासाठी वेळ देत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अनुष्का शर्माला 6 कोटी 70 लाख लोक फॉलो करतात.  

View this post on Instagram
 
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराट कोहली फॉर्ममध्ये परतणार

दरम्यान, विराट कोहली टी वर्ल्ड कपसाठी उशिरानं अमेरिकेत दाखल झाला होता. तो बांगलादेश विरुद्धचा सराव सामना खेळू शकला नव्हता. आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध विराट कोहलीला दमदा कामगिरी करता आली नव्हती. भारत विरुद्ध कॅनडा मॅचमध्ये विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये येईल अशी अपेक्षा होती. मात्र, पावसामुळं ती मॅच रद्द करावी लागली होती. आता सुपर 8 मध्ये विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुपर 8 च्या लढती वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. त्यामुळं विराट कोहलीला फॉर्म गवसल्यास भारताला त्याचा फायदा होऊ शकतो. 

संबंधित बातम्या : 

Shubman Gill : रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या चर्चा, शुभमन गिलची एक कृती अन् एका दगडात दोन पक्षी मारले...

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 28 March 2025Asim Sarode On Koratkar Case : प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकील असीम सरोदे आणि इंद्रजीत सावंत काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 28 March 2025Gauri Khedkar Death News : महाराष्ट्रातल्या तरुणीची नवऱ्याकडून बंगळुरूमध्ये हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरुन स्वत: केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Embed widget