Shubman Gill : रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या चर्चा, शुभमन गिलची एक कृती अन् एका दगडात दोन पक्षी मारले...
Rohit Sharma Shubman Gill : रोहित शर्माला शुभमन गिलनं अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर शुभमन गिलनं इनस्टाग्राम स्टोरीवर रोहित शर्मासोबत फोटो शेअर करुन वादावर पडदा टाकला आहे.
![Shubman Gill : रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या चर्चा, शुभमन गिलची एक कृती अन् एका दगडात दोन पक्षी मारले... Shubman Gill Share photo with Rohit Sharma on Instagram Story T20 World Cup 2024 Marathi News Shubman Gill : रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या चर्चा, शुभमन गिलची एक कृती अन् एका दगडात दोन पक्षी मारले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/80820ace544bf18d7e4bb906c218c3221718532548634989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टीम इंडियाचा युवा खेळाडू सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill )यानं कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma)अनफॉलो केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. या चर्चा वाढण्यापूर्वीच शुभमन गिलनं या वादावर पडदा टाकला आहे. रोहित शर्मासोबतचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवून शुभमन गिलनं वादाला पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्मासोबतचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवत शुभमन गिलनं मी शिस्तीचं पालन कसं करायचे याचे धडे रोहित शर्माकडून घेतल्याचं म्हटलं आहे.
शुभमन गिलचं स्पष्टीकरण
शुभमन गिल आणि आवेश खानला बीसीसीआयनं टी-20 वर्ल्ड कपमधून मुक्त करत त्यांना मयादेशी परतण्यास सांगितलं होतं. शिस्तपालनासंदर्भातील काही मुद्दे त्याला कारणीभूत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, त्याचवेळी शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, शुभमन गिलनं एक फोटो पोस्ट करत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
शुभमन गिलची टी 20 वर्ल्ड कपची संधी हुकली
शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कप्टन म्हणून जबाबदारी पाहत होता. गुजरात टायटन्सला यापूर्वीच्या दोन आयपीएलमधील कामगिरी सारखी कामगिरी यावेळी करता आली नव्हती. शुभमन गिल देखील यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकला नव्हता. त्यामुळं शुभमन गिलची टी 20 वर्ल्ड कपमधील संधी हुकली होती. शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. मात्र, शुभमन गिलला, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान यांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली होती.
टीम इंडिया सुपर 8 मध्ये
टीम इंडियानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरोधात लढेल. तर, गट ड मधून बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यापैकी जो संघ सुपर 8 मध्ये येईल, त्यांच्या विरोधात टीम इंडियाची मॅच असेल. भारत विरुद्ध अफगाणिस्तान 20 जून, भारत विरुद्ध गट ड मधील दुसरा संघ यांच्यात 22 जूनला मॅच होईल. तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 24 जूनला मॅच होणार आहे. या तीन मॅच पैकी दोन मॅच भारतानं जिंकल्यास त्यांना सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप भारतीय संघ 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवणार का हे पाहावं लागेल. भारतानं 2007 मध्ये पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.
संबंधित बातम्या :
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)