'खेळापेक्षा कोणीच मोठं नाही,' विराट-रोहित वादाच्या बातम्यांवर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया
नुकतंच भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटकडून रोहितकडे जबाबदारी सोपवण्यात आली. ज्यानंतर भारतीय संघात वाद असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.
India Tour of South Africa 2021 : नुकतचं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं, ज्यामुळे भारतीय क्रिकेट संघात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधान येऊ लागलं. ज्यावर देशाचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत,'खेळापेक्षा कोणीही मोठं नाही, तसंच संघात नेमकं काय सुरु आहे हे मी सांगू शकत नाही' असं ठाकुर म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघात मागील काही महिन्यांपासून बरेच बदल होत आहे. टी20 विश्वचषक होताच संघाचे मुख्यप्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पदाचा त्याग केला. ज्यानंतर राहुल द्रविडने ही जागा घेतली. दुसरीकडे विराट कोहलीने टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. पण आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही विराटकडून रोहितकडे सोपवण्यात आलं. ज्यावेळी विराट आफ्रिका दौऱ्यात विश्रांती घेणार असल्याची माहितीही समोर येत होती. ज्याबाबत बोलताना विराटने मी असं काही सांगितलं नसून मी एकदिवसीय सामन्यांसाठी कायम उपलब्ध होतो आणि आहे, असं सांगितलं. ज्यानंतर भारतीय संघात वाद होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. ज्यावर भारताचे क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत, 'खेळापेक्षा कोणीही मोठं नाही, तसंच संघात नेमकं काय सुरु आहे हे मी सांगू शकत नाही. याबद्दलची माहिती संबधित फेडरेशनचं देऊ शकतं' असंही ठाकुर म्हणाले.
पत्रकार परिषद घेत विराटचा मोठा खुलासा
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराटकडून रोहितला देण्यात आलं. ज्यानंतर 'जानेवारीत विश्रांती मिळावी अशी विनंती विराटनं बीसीसीआयला केली तसंच 9 जानेवारीला विराटची लेक वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ब्रेक द्यावा असं विराटनं बीसीसीआयला कळवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.' ज्यावर विराटने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 'पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या मालिकेत खेळण्यास मी तयार आहे. विश्रांतीसाठी मी बीसीसीआयकडे (BCCI) वेळ मागितला नाही. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत,' असा खुलासा विराटने केला. तसंच विराट कोहलीने यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या दाव्यावरही आपली बाजू मांडली. 'रोहित शर्माला एकदिसीय संघाचा कर्णधार बनविण्याच्या बाबत मी विराट कोहलीला सांगितलं होतं. असं सौरव गांगुली यांनी म्हटले होते.' परंतु, यावर विराटने बीसीसीआयकडून मला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही, असा धक्कादायक खुलासा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- SA Vs IND: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, केएल राहुल दुखापतीतून सावरला; सरावासाठी मैदानात दाखल
- India Tour of South Africa 2021: कर्णधारपदावरून टीम इंडियात वाद? कसोटी मालिकेतून रोहित बाहेर, एकदिवसीय मालिकेबाबत विराटचा मोठा निर्णय
- Happy Birthday Kuldeep Yadav: अपयशानं खचला, तेव्हा थेट आत्महत्येचा निर्णय घेतला; कुलदीप यादवच्या आयुष्यातील थरार