हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट झालेल्या नताशाने पूलमध्ये खास व्यक्तीसोबत केली 'मस्ती'; व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का
Hardik Pandya Natasha Stankovic: नताशा स्टॅनकोविकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Hardik Pandya Natasha Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांनी काही महिन्यांपूर्वी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचा मुलगा अगस्त्य दोघांकडे राहताना दिसून येतो. काही दिवासांआधी अगस्त्य नताशाच्या मायदेशी सर्बियाला गेला होता. तर त्यानंतर अगस्त्य हार्दिक पांड्यासोबत दिसला होता. नताशा आणि हार्दिकचे घटस्फोट होण्याचे विविध कारण सांगितले जात होते. मात्र अधिकृत कोणतीच माहिती समोर आली नव्हती. याचदरम्यान नताशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अलेक्झांडर अलेक्स इलिकने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
अलेक्झांडर अलेक्स इलिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो नताशासोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अलेक्झांडर आणि नताशा पूलमध्ये एकत्र दिसत आहेत. नताशा पूलमध्ये आराम करत आहे, त्याचवेळी अलेक्झांडर तिला पाण्यात ढकलतो. हार्दिकपासून वेगळे होण्यापूर्वीही अलेक्झांडर अलेक्स इलिक नताशासोबत अनेकदा दिसला होता.
View this post on Instagram
कोण आहे अलेक्झांडर अलेक्स इलिक?
नताशाप्रमाणेच अलेक्झांडरही सर्बियातून आला आहे. गेल्या सात वर्षांपासून तो भारतात राहत असून मॉडेल आणि अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. अलेक्झांडर हा सोनम कपूरसोबत 2018 मध्ये प्रदर्शित झालेला कॉमेडी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'मधील 'तारीफान' नावाच्या गाण्यात दिसला होता.
चार वर्षांचा संसार मोडला-
हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.