एक्स्प्लोर

Coronavirus | आयपीएलचा तेरावा सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार

कोरोना व्हायरसचा धोका पाहता आयपीएलच्या नव्या मोसमाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अखेर आयपीएलचं आयोजन लांबणीवर पडलं असून, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चपासून सुरु होणारी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 13चं आयोजन लांबणीवर पडलं आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरु होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (आयसीसी) ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनीही हा मोसम 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती. आयसीसीने आयपीएल 13च्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीझनची सुरुवात 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून होईल. आयसीसीच्या घोषणेआधी अशी अटकळ बांधली जात होती की, शनिवारी (14 मार्च) होणाऱ्या आयपीएलच्या गर्व्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत या मोसमाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निर्णय होऊ शकतो. याआधी दिल्ली सरकारने राज्यातील आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर बंदी घातली होती. तर महाराष्ट्र सरकारने राज्यात आयपीएल तिकीटांच्या विक्री बंदी घालण्याची घोषणा केली होती. याशिवाय कर्नाटक सरकारचाही आपल्या राज्यात आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर बंदी घालण्याबाबत विचार सुरु होता. #CoronaVirus | आयपीएलची तिकीट विक्री होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती परदेशी खेळाडूंना व्हिसा नाही केंद्र सरकारने बुधवारी (11 मार्च) परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला होता. सरकारने 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आयपीएलमधील विविध संघांनी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती. 29 मार्च ते 24 मे दरम्यान आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन केलं जाईल, अशी घोषणा बीसीसीआयने सुरुवातीला केली होती. परंतु वेळापत्रकाबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नव्हती. Corona effect on India vs Africa ODI series | भारत-दक्षिण आफ्रिका संघांमधील दुसरा सामना प्रेक्षकांविनाच खेळवणार

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget