(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohit Grewal Wins Bronze : कुस्तीपटू मोहित ग्रेवालनेही जिंकलं कांस्यपदक, कुस्तीपटूंचं सहावं तर भारताच्या खात्यात 26 वं पदक
Commonwealth Games 2022 : कुस्तीपटू मोहित ग्रेवालने नुकतंच कांस्यपदक जिंकल्यामुळे स्पर्धेच्या आठव्या दिवशी मैदानात उतरलेल्या सर्वच्या सर्व भारताच्या कुस्तीपटूंनी पदक मिळवलं आहे.
Wrestling in Commonwealth 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेतील (Commonwealth Games 2022) आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंसाठी अत्यंत खास ठरला. विशेष म्हणजे भारताच्या आज मैदानात उतरलेल्या सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदक नावे केलं आहे. नुकताच पुरुषांच्या 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्य पदक नावे केलं आहे. आधीच्या सामन्यात पराभूत मोहितने आता जमाईकाच्या आरॉन जॉन्सनला (Aaron Johnson) मात देत कांस्य पदकावर नाव कोरंल आहे.
2️⃣6️⃣th MEDAL FOR INDIA 🤩
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
Debutant Mohit Grewal (M-125kg) wins 🥉at #CommonwealthGames2022 leading the bout & finally pinning his opponent to seal the match 💪
VICTORY BY FALL FOR MOHIT 🔥
With this 🇮🇳 wins 6/6 🏅 in 🤼♂️🤼♀️ today at #B2022
Fantastic effort 👏
Congratulations 🎊 pic.twitter.com/QEOcPePduS
भारताच्या सर्वच कुस्तीपटूंनी आज कमाल कामगिरी केली. सुरुवातीपासून विजय मिळवणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये महिला कुस्तीपटू दिव्या काकरान आणि मोहित ग्रेवाल पराभूत झाले. पण दोघांनीही कांस्य पदकाच्या सामन्यात विजय मिळवला आहे.
भारताचं कुस्तीतील सहावं पदक
आज भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडताना दिसून आले. सर्वात आधी अंशूने रौैप्य नंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने आणि आता मोहित ग्रेवालने कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर गेली आहे.
हे देखील वाचा-