एक्स्प्लोर
Advertisement
सरफराजच्या नेतृत्त्वात कोहली खेळणार, धोनी आऊट, आयसीसीचा संघ जाहीर
लंडन: पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर, आता आयसीसीने 'चॅम्पियन्स ट्रॉफी 2017' ची टीम जाहीर केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे या संघाचं नेतृत्त्व पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदकडे देण्यात आलं आहे. सोमवारी या संघाची घोषणा करण्यात आली.
या संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचाच समावेश झाला आहे.
शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करुन गोल्डन बॅटचा पुरस्कार पटकावला. तर भुवनेश्वरने जबरदस्त कामगिरी करत सात विकेट घेतल्या.
दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी किंवा हार्ड हिटर हार्दिक पांड्या, रोहित शर्मा हे या संघात स्थान मिळवू शकले नाहीत.
पाकिस्तानच्या 4 खेळाडूंचा समावेश
आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात पाकिस्तानच्या चार खेळाडूंना स्थान मिळालं आहे. फायनलमध्ये खणखणीत शतक ठोकणारा पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानने संघात एण्ट्री मिळवली आहे.
झमानशिवाय आणखी तीन पाकिस्तानी खेळाडू या संघात आहेत. यामध्ये कर्णधार/विकेट किपर सरफराज अहमद, वेगवान गोलंदाज जुनैद खान आणि हसन अली यांचा समावेश आहे.
याशिवाय इंग्लंडच्या तीन, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या एक-एक खेळाडूला संधी मिळाली आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स, आदील राशिद आणि ज्यो रुट यांचा समावेश झाला आहे. तर बांगलादेशच्या तमीम इकबालनेही आयसीसीच्या संघात प्रवेश केला.
न्यूझीलंडचा निवड झालेला एकमेव खेळाडू म्हणजे त्यांचा कर्णधार केन विल्यमसन. मात्र तो बारावा खेळाडू असेल.
आश्चर्य म्हणजे या संघात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दमदार संघातील एकही खेळाडू आयसीसीच्या संघात स्थान मिळवू शकला नाही.
आयसीसीचा संघ कोणी निवडला?
आयसीसीच्या चॅम्पियन्स संघाची निवड इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल एथर्टन, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा, क्रिकेट पत्रिका विज्डन अल्मानकचे संपादक लॉरेन्स बूथ आणि वृत्तसंस्था एएफपीचे क्रिकेट पत्रकार ज्युलियन गुयेर यांच्या समितीने केली. या समितीचे अध्यक्ष आयसीसीचे महाव्यवस्थापक जॉफ अलाडाईस होते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संघ: सरफराज अहमद (पाकिस्तान, कर्णधार/विकेटकीपर), शिखर धवन (भारत), फखर झमान (पाकिस्तान), तमीम इकबाल (बांगलादेश), विराट कोहली (भारत), ज्यो रूट (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), आदील राशिद (इंग्लंड), जुनैद खान (पाकिस्तान), भुवनेश्वर कुमार (भारत), हसन अली (पाकिस्तान), केन विल्यमसन (12वा खेळाडू,न्यूझीलंड).
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement