एक्स्प्लोर
Advertisement
आफ्रिकेवरील विजय सर्वोत्तम, पण... : विराट कोहली
लंडन: दक्षिण आफ्रिकेवर आठ विकेट्सनी मिळवलेला विजय ही यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाची सर्वोत्तम कामगिरी असल्याची प्रतिक्रिया, कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केली आहे. पण या कामगिरीवर आम्हाला संतुष्ट राहून चालणार नाही, असा इशाराही त्यानं आपल्या शिलेदारांना दिला.
गतविजेत्या टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या अस्तित्त्वाच्या लढाईत तब्बल बारा षटकं राखून दक्षिण आफ्रिकेचे बारा वाजवले. भारतीय शिलेदारांनी या सामन्यात परिपूर्ण कामगिरी बजावली, असं मत विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे.
"नाणेफेकीचा कौल आमच्या बाजूनं लागला. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होती. पण आमच्या क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांच्या सांघिक प्रयत्नांना साथ दिली. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा डाव 191 धावांत आटोपला. क्रिकेटच्या मैदानात मिळालेली संधी सोडायची नसते. टीम इंडियानं नेमकं तेच केलं", या शब्दांत विराटनं आपल्या सहकाऱ्यांना शाबासकी दिली.
एबी डिव्हिलियर्सची विकेट स्वस्तात मिळणं हे तुमच्या फायद्याचं ठरतं. कारण त्यानं खेळपट्टीवर जम बसवला की काय करेल याचा नेम नसतो, या शब्दांत विराटनं एबीच्या विकेटचं मोल समजावून दिलं.
संबंधित बातम्या
भारताने आफ्रिकेला त्यांच्याच औषधाचा डोस पाजला!
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचे सेहवागला अपशब्द, मनोज तिवारीचं उत्तर
शिखर धवनची लव्ह स्टोरी
टीम इंडियाची उपांत्य सामन्यात बांगलादेशसोबत टक्कर
टीम इंडियाची उपांत्य सामन्यात धडक, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement