(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BWF World Championships: पी.व्ही सिंधुची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, थायलँडच्या पोर्नपावी चोचुवँगचा केला पराभव
भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं (PV Sindhu) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय.
BWF World Championships: भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं (PV Sindhu) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय. स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधुनं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगचा (Pornpawee Chochuwong) पराभव करून उपांत्य पूर्व स्पर्धेत धडक दिलीय. या स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूनं चोचुवँगवर 21-14, 21-18 अशी सरळ सेटमध्ये मात केलीय. पीव्ही सिंधूचा पॉर्नपावीविरुद्ध आठ सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामन्यात पीव्ही सिंधुचा विजय झालाय. तर, तीन सामन्यात तिला पराभव स्वीकारावा लागलाय.
सिंधूने पॉर्नपावीविरुद्ध चालू मोसमातील दोन पराभवांचा बदलाही घेतलाय. या महिन्याच्या सुरुवातीला, पोर्नपावीनं मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये देखील सिंधूचा पराभव केला होता. त्यानंतर बीडब्लूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या गट सामन्यातही सिंधूचा पराभव केला होता. पीव्ही सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीत ताई यिंगशी सामना होणार आहे. ताई यिंगनं या स्पर्धेत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा 21-10, 19-21, 21-11 च्या फरकानं पराभव केलाय.
इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धा
पी.व्ही सिंधुला इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलँडच्या रेचानोक इंतानोननंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोक इंतानोननं तिला 54 मिनिटात 15-21, 21-9 आणि 21-14नं पराभूत केलं होतं.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक हुकलं
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमघध्ये सिंधू अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळं तिचं सुवर्णपदक हुकलं होतं. तिला दुसऱ्या स्थानावर रौप्यपदकासह समाधान मानावं लागलं होतं. सिंधूला दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने मात दिली होती. पीव्ही सिंधू आणि एन सेयुंग यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच एकतर्फी होत होता. एन सेयुंगने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. ज्यामुळे सिंधूला सामन्यात आगमन करण्याचा वेळ मिळालाच नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Ashes Test Series 2021: चार फूट दूर जाणारा चेंडू एका हातानं पकडला, अॅशेस मालिकेत जॉस बटलरनं टीपला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
- PAK vs WI : पाक-विंडीज मालिकेत चौकार-षटकार नव्हे कोरोनाचा हाहा:कार, तब्बल 8 जण पॉझिटिव्ह
- PKL 2021: प्रो कबड्डी लीगला 22 डिसेंबरपासून सुरुवात; कोणत्या संघानं जिंकली सर्वाधिक विजेतेपदे? पाहा यादी