Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाची 'सुवर्ण'कामगिरी! 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेची 'गोल्ड'ला गवसणी
Asian Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेने एशियन स्पर्धांमध्ये सुवर्णकामगिरी केली असून त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने एशियन गेम्सच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच एथलेटिक्स स्पर्धांमधलं (Asian Games) भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. चीनमधून भारतासाठी ही भारतासाठी ही 'गोल्ड' बातमी आलीये. तर अविनाशच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तर आता भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांची संख्येत वाढ झाली आहे.
चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या 38 पर्यंत पोहचली आहे. भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. यजमान चीन अव्वल स्थानावर आहे. जपान दुसऱ्या तर रिपब्लिक ऑफ कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
#IndiaAtAG22🇮🇳
— All India Radio News (@airnewsalerts) October 1, 2023
Avinash Sable wins GOLD🥇in 3000m Steeplechase. #AsianGames2022 | #IndiaAtAsianGames |#AsianGames pic.twitter.com/h3PzBmYcJr
मराठमोळा अविनाश साबळे
अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.
तजिंदरपाल सिंहची देखील सुवर्णकामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुटमध्ये भारताच्या तजिंदरपाल सिंह तूरने देखील सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने सुरुवातीला मॉन्स्टर फर्स्ट थ्रोने सुरुवात केली. त्याचा हा थ्रो जवळपास 20 मीटरच्या आसपास पोहोचला. परंतु तो नो थ्रो मानला गेला. त्यानंतर त्याचा दुसरा थ्रो देखील बाद करण्यात आला. तर सुवर्णपदकासाठी त्याने चौथा थ्रो हा 20.06 मीटरचा केला पण त्या फेरतीही तो थोडा मागे पडला. तर त्याने सहाव्या प्रयत्नात 20.36 मीटर थ्रोसह सुवर्णपदकावर नाव कोरलं.
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करत पदक पक्के केले आहे. यंदा भारताच्या नावावर कमीतकमी 100 पदकांची नोंद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Asian Games 2023 : भारताच्या खात्यात 38 पदकं,गुणतालिकेत चौथ्या स्थानी, पाहा लेटेस्ट अपडेट