Asian Games 2023 : भारताच्या खात्यात 38 पदकं,गुणतालिकेत चौथ्या स्थानी, पाहा लेटेस्ट अपडेट
Asian Games 2023 Medal Tally After Day 7 : चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे.
Asian Games 2023 Medal Tally After Day 7 : चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या 38 पर्यंत पोहचली आहे. भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.भारताने आतापर्यंत दहा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. यजमान चीन अव्वल स्थानावर आहे. जपान दुसऱ्या तर रिपब्लिक ऑफ कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतासाठी शूटिंगमधून सर्वाधिक पदके आली आहेत. नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या विविध इव्हेंट्समधून भारताला आतापर्यंत 19 पदके मिळाली आहेत. यामध्ये सहा गोल्ड, सहा रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आह. घोडेस्वारी, स्क्वॅश, महिला क्रिेट आणि टेनिस मिश्र.... या प्रकरात भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 38 पदकांचा समावेश आहे. यामध्ये दहा सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.
गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या नावावर तब्बल 216 पदकांची नोंद आहे. एकट्या चीनने 114 सुवर्णपदकांची लूट केली आहे. 68 रौप्य आणि 34 कांस्य पदके चीनच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जपानच्या नाववर 105 पदकांची नोंद आहे. याध्ये 28 गोल्ड, 38 रौप्य आणि 39 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असमार्या रिपब्लिक ऑफ दक्षिण कोरियाने 110 पदके जिंकली आहेत. पण सुवर्णपदके जपानने जास्त जिंकल्यामुळे ते दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
आठव्या दिवशी भारताच्या पदकात पडणार भर -
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करत पदक पक्के केले आहे. यंदा भारताच्या नावावर कमीतकमी 100 पदकांची नोंद होण्याची शक्यता आहे.
बॅडमिंटन: भारत विरुद्ध चीन - पुरुष टीम (फायनल)
तेजिंदरपाल सिंह तूर आणि साहिब सिंह - पुरुष गोळे फेक (फायनल)
जेसविन एल्ड्रिन आणि श्रीशंकर मुरली - लांब उडी (फायनल)
अविनाश साबळे -3000 मीटर स्टीपलचेज (फायनल)
सीमा पूनिया - महिला डिस्कस थ्रो (फायनल)
हरमिलन बैंस आणि दीक्षा - महिला 1,500 मीटर (फायनल)
जिन्सन जॉनसन आणि अजय सरोज - 1,500 मीटर रनिंग (फायनल)
ज्योति याराजी आणि नित्या रामराज -100 मीटर (फायनल)
बॉक्सिंग - निकहत जरीन विरुद्ध रकसत चुथामत - महिला 50 किलो (सेमीफायनल)
#IndiaAtAsianGames : Day 7 - Latest Medal Tally
— All India Radio News (@airnewsalerts) September 30, 2023
India win 2 Gold, 2 Silver & 1 Bronze Today
India🇮🇳 at Number - 4
Total Medals - 38
🥇Gold - 10
🥈Silver - 14
🥉Bronze - 14#AsianGames2022 | #IndiaAtAG22 | #AsianGames | #Cheer4India pic.twitter.com/2X18b9a4nE