एक्स्प्लोर
भारताच्या 6 संघांची आज निवड, कोहलीच्या जागी श्रेयस निश्चित
भारताचे 6 संघ आज निवडले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष आहे.
मुंबई: विविध क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची आज निवड होणार आहे. भारताचे 6 संघ आज निवडले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष आहे.
विराटच्या जागी श्रेयस अय्यर?
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्याचा घेतलेला निर्णय श्रेयस अय्यरच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत.
कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेल्या विराट कोहलीच्या जागी, दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची निवड होण्याची शक्यता आहे.
भारत आणि अफगाणिस्तान संघांमधला एकमेव कसोटी सामना 14 ते 18 जून या कालावधीत बंगळुरुत होणार आहे. याच कालावधीत विराट कोहली कौंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे.
त्यामुळं त्यानं अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. विराटच्या अनुपस्थितीत मुंबईच्या श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.
दरम्यान, विराटच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येईल.
आज भारताच्या 6 संघांची नियुक्ती
दरम्यान, आज बीसीसीआय भारताच्या 6 संघांसाठी खेळाडूंची निवड करणार आहे. यामध्ये
- अफगाणिस्तानविरुद्धची 1 कसोटी,
- इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ
- इंग्लंड आणि वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ
- आयर्लंडविरुद्ध टी 20 संघ
- इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 संघ
- इंग्लंडविरुद्ध वन डे संघ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement