एक्स्प्लोर

Australian Open 2023 ट्रॉफीवर नोवाक जोकोविचनं कोरलं नाव, नदालच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी

Australian Open 2023 : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव केला आहे.

Novak Won Australian Open 2023 : टेनिस खेळाचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच यानं (Novak djokovic) त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या (Australia Open 2023) पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्यानं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा (Stefanos Tsitsipas) पराभव केला आहे. नोवाकनं स्टिफनोसला 6-3,7-4 आणि 7-6 अशा असा सरळ सेटमध्ये पराभूत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.  विशेष म्हणजे यासोबत त्यानं स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेलच्या ग्रँडस्लॅमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यामुळे त्याच्याकडील ग्रँडस्लॅमची संख्या 22 झाली आहे. त्याने नदालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सोबतच नोवाकचं हे 10 वं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद असून नदालनंही 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. याशिवाय नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावून जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Australian Open (@australianopen)

मागील वर्षी मुकला होता ऑस्ट्रेलिया ओपनला

2021 मध्ये नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद पटकावलं होतं. पण कोविड प्रोटोकॉलमुळे 2022 च्या सीझनमध्ये तो खेळू शकला नाही. स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लसीकरण अनिवार्य केलं होते, तर नोव्हाकला लसीकरणासंबंधीची माहिती सार्वजनिक करायची नव्हती. त्यामुळे तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन खेळू शकला नव्हता. तसंच आजच्य़ा सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, चौथ्या मानांकित नोवाकनं ग्रीसच्या त्सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर सर्बियन स्टार नोवाकला दुसरा आणि तिसरा सेट जिंकण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले, जोकोविचने दुसरा सेट 7(7)-6(4) ने जिंकला. त्यानंतर तिसरा सेट 7(7)-6(5) ने जिंकला.

विम्बल्डनमध्येही केली होती ऐतिहासिक कामगिरी

नोवाक हा मागील काही वर्षात इतकी अप्रतिम कामगिरी करत आहे, की त्याने दिग्गज खेळाडू राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांना तगडी झुंज दिली आहे. विम्बल्डन 2022 या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावलं. जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम यावेळी केला होता. विशेष म्हणजे त्या जेतेपदासह त्याच्याकडं 21 ग्रँड स्लॅम झाली होती. ज्यामुळे त्यानं ग्रेट टेनिस प्लेअर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला (Roger Federer) मागे टाकलं होतं. ज्यानंतर आता टॉपवर असणाऱ्या राफेलशीही त्याने बरोबरी साधली आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी; पती-पत्नी, भाऊ-भावजय, मेव्हणा, भाचाही मैदानात
घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी; पती-पत्नी, भाऊ-भावजय, मेव्हणा, भाचाही मैदानात
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget