एक्स्प्लोर

मी गे नाही, 'बॉयफ्रेण्ड'सोबतच्या फोटोवरील चर्चांनंतर जेम्स फॉकनरचं स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियाच्या संसदेने मॅरेज अमेन्डमेंट (डेफिनिशन अँड रिलीजियस फ्रीडम) अॅक्ट 2017 मंजूर केल्यानंतर अनेक खेळाडूंनी समलिंगी लग्न केली आहेत.

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरने काल (29 एप्रिल) शेअर केलेला एका फोटो आणि कॅप्शनवरुन तो गे असल्याची चर्चा रंगली. त्याच्या या पोस्टला हजारो चाहत्यांनी पाठिंबा दिला, शिवाय त्याचं कौतुकही केलं. मात्र आज त्याने नवी पोस्ट शेअर करुन आपण गे नसल्याची कबुली दिली आहे. काय आहे प्रकरण? त्याचं झालं असं, जेम्स फॉकरने आपल्या 29वा वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. "बर्थ डे डिनर विथ बॉयफ्रेण्ड (बेस्ट मेट) रॉब जब आणि आई रोजलिन कॅरोल फॉकनर #टूगेदरफॉर5इयर्स," असं कॅप्शन या फोटोला त्याने दिलं होतं. या फोटो आणि कॅप्शनवरुन तो गे असल्याची तुफान चर्चा रंगली. शिवाय समलिंगी असल्याचं जाहीर करणारा जेम्स फॉकनर हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटर असल्याचं म्हटलं जात होतं. Birthday dinner with the boyfriend (best mate!!!) @robjubbsta and my mother @roslyn_carol_faulkner ❤️❤️❤️ #togetherfor5years
परंतु आपल्या फोटो आणि पोस्टचा चुकीचा अर्थ लागल्याचं समजल्यानंतर त्याने आज (30 एप्रिल) सकाळी नवी पोस्ट शेअर करुन आपण गे नसल्याचा खुलासा केला. त्याने लिहिलं आहे की, "काल रात्रीच्या माझ्या पोस्टवरुन मोठा गैरसमज झाल्याचं दिसतंय. मी गे नाही. पण एलजीबीटी कम्युनिटीकडून आणि कम्युनिटीसाठी मिळालेला पाठिंबा पाहून आनंद झाला. प्रेम हे प्रेम असतं, हे कधीही विसरता कामा नये. मात्र रॉब जब माझा फक्त चांगला मित्र आहे. आम्ही पाच वर्षांपासून हाऊसमेट आहोत, कालची रात्री ही त्याचं सेलिब्रेशन होतं. तुम्ही फारच पाठिंबा दिलात यासाठी धन्यवाद."
याआधी काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर हेली जेनसनेने ऑस्ट्रेलियाची अनकॅप्ड महिला क्रिकेट निकोला हॅन्कॉकसोबत लग्न केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या संसदेने मॅरेज अमेन्डमेंट (डेफिनिशन अँड रिलीजियस फ्रीडम) अॅक्ट 2017 मंजूर केल्यानंतर अनेक खेळाडूंनी समलिंगी लग्न केली आहेत. जेम्स फॉकनरने 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. यात त्याने 96 विकेट्स घेतल्या आहेत. तर 24 ट्वेण्टी 20 सामन्यात त्याच्या नावावर 36 विकेट्स जमा आहेत. फॉकनरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 34 पेक्षा जास्त सरासरीने 1032 धावा केल्या आहेत. वन डेमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget