एक्स्प्लोर

Andrew Symonds : ...म्हणून क्लार्कसोबतच्या नात्यात दुरावा! आयपीएलबाबत अँड्र्यू सायमंड्सनं केलं होतं खळबळजनक वक्तव्य   

Australia Cricketer Andrew Symonds Death News : अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) आणि मायकेल क्लार्क (Michael Clarke) यांची जोडी एकेकाळी संघासाठी मजबूत बाजू मानली जात होती.

Andrew Symonds Death News : ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं.

अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) आणि मायकेल क्लार्क (Michael Clarke) यांची जोडी एकेकाळी संघासाठी मजबूत बाजू मानली जात होती. परंतु, काही काळानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अँड्र्यू सायमंड्स त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर होता. दरम्यान, मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना अँड्र्यू सायमंड्सनं संघाच्या एका मीटिंगमधून बाहेर पडला. ज्यामुळं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं. 2008 मध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यापूर्वी अँड्र्यू सायमंड्स दारूच्या नशेत असल्याचा आरोप मायकल क्लार्क केला होता. 2015 साली अँड्र्यू सायमंड्सनं देखील मायकल क्लार्कवर जोरदार टीका केली होती.

मायकल क्लार्कनं 2015 मध्ये ऍशेस डायरीमध्ये असं लिहलं होतं की,अँड्र्यू सायमंड्स टीव्हीवर माझ्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी गेला. सायमंड्स असा व्यक्ती आहे, ज्याच्यासाठी कोणावर चारित्र्यावर चिखलफेक करणं मोठी गोष्ट नाही, असं मायकल क्लार्क त्यावेळी म्हणाला होता.  ब्रेट लीनं पॉडकास्टवर बोलताना अँड्र्यू सायमंड्सनं याविषयावर भाष्य केलं होतं. आयपीएलमध्ये चांगला पैसा मिळाल्यानंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं त्यानं सांगितलं होतं. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 साली सायमंड्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू होता. पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सनं त्याला 5.4  कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

क्लार्कसोबतच्या वादावर स्पष्टीकरण देताना अँड्र्यू सायमंड्सनं म्हटलं होतं की, मायकल क्लार्कसोबतची माझी मैत्री चांगली होती. ज्यावेळी त्यानं ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळताना सुरुवात केली. त्यानं संघात आल्यानंतर मी त्याची पूर्ण काळजी घेतली. मला असं वाटतं की, आयपीएलच्या पैशांमुळं आमच्या नात्यात दुरावा आला, असं सायमंड्स म्हणाला होता.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Satara : Sharad Pawar साताऱ्यात दाखल , माढा आणि साताऱ्याचा उमेदवार ठरणार ?Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
Embed widget