Asian Games 2023 : 17 वर्षांच्या पलकचा 'सुवर्णभेद', 18 वर्षाच्या ईशाला रौप्यपदक; आशियाई स्पर्धेत भारताचं आठवं सुवर्णपदक
Asian Games 2023 6th Day India : आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पलक पलकने सुवर्णपदक आणि ईशाने रौप्यपदक पटकावलं आहे.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा 2023 (Asian Games 2023) मध्ये महिलांच्या 10 मीटर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (Shooting 10m Air Pistol Women) प्रकारात भारताच्या नेमबाजीमध्ये (Shooting) पलकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर, ईशा सिंगने रौप्यपदक पटकावलं आहे. भारताचं हे आठवं सुवर्ण पदक आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 30 पदकांची कमाई केली आहे.
17 वर्षांच्या पलकचा 'सुवर्णभेद', 18 वर्षाच्या ईशाला रौप्यपदक
भारताला 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्यपदकही मिळालं आहे. 17 वर्षांच्या पलकचे सुवर्णपदक पटकावलं. तर 18 वर्षीय ईशा सिंगने रौप्य पदक जिंकलं. यामुळे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्णपदक आणि रौप्यपदक दोन्ही मिळाले आहेत.
🥇 A Brilliant Victory Unfolds! 🌟
— SAI Media (@Media_SAI) September 29, 2023
🇮🇳's 10m Air Pistol shooter and #KheloIndiaAthlete Palak has clinched the GOLD MEDAL at #AsianGames2022, adding another glorious chapter to our nation's shooting legacy! 🥇🔫
The 17 year old has not only delivered big but surprised us all!… pic.twitter.com/KVuN6yCIGs
आशियाई स्पर्धेत भारताचा डंका
पलकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत 242.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर ईशा सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. यासोबतच पाकिस्तानी खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
ASIAN GAMES 2023: Silver 🥈 for India in shooting!
— Game On (@gameonbynewj) September 29, 2023
Esha Singh, Palak and Divya Thadigol won the silver medal in the Women's 10m Air Pistol Team event.#AsianGames #AsianGames2022 #india #GameOn #AajNEWJDekhaKya pic.twitter.com/9Q323xcUZp
भारतासाठी ईशाकडून चार पदकांची कमाई
आशियाई क्रीडा स्पर्धेत ईशा सिंगने 2023 च्या भारतासाठी चार पदके जिंकली आहेत. ईशाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. यापूर्वी हैदराबादच्या रहिवासी 18 वर्षीय ईशाने 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं.
भारताच्या खात्यात आतापर्यंत 30 पदकं
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताने दमदार सुरुवात केली आहे. नेमबाजांनी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. यासोबतच नेमबाजीतच दोन रौप्यपदकेही पटकावली आहेत. मात्र, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीचा पराभव झाला. भारताच्या नावावर आतापर्यंतच्या खेळांमध्ये 8 सुवर्णांसह एकूण 30 पदके आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :