टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानी अॅपनं भारताला केलं ट्रोल, झोमॅटोनं दाखवली जागा
IND vs Pak : आशिया चषकात सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघानं भारताचा पाच विकेटनं पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयानंतर सोशल मीडियावर भारताच्या पराभवाची चर्चा सुरु झाली.
IND vs Pak : आशिया चषकात सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघानं भारताचा पाच विकेटनं पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयानंतर सोशल मीडियावर भारताच्या पराभवाची चर्चा सुरु झाली. भारतीय चाहते नाराज झाले होते. त्यातच भर म्हणून पाकिस्तानी अॅपनं भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. भारताच्या पराभवानंतर करीम पाकिस्तानने मिम्स शेअर करत भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. करीम पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत झोमॅटनं तोंड बंद केलं आहे.
भारतीय संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानमधील ऑनलाइन डिलिव्हरी अॅप करीम पाकिस्ताननं मिम्स शेअर करत भारताला चिडवण्याचा प्रयत्न केला. करीम पाकिस्तानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरुन हेराफेरी फिल्ममधील परेश रावलचा फोटो पोस्ट केला. yeh toh kisi ke rone ki awaax hai असे फोटोवर लिहिलेलं आहे. हा फोटो पोस्ट करत करीम पाकिस्तानंने लिहिले की, आम्ही तर ऑर्डरसाठी फोन केला होता.... अन् झोमॅटोला टॅग केलं होतं. त्यावर झोमॅटोनं सडेतोड उत्तर दिलं. मिम्स टेम्टलेट कर स्वत:चा वापर करा... असा रिप्लाय दिला. यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये सोशल वॉर सुरु आहे. एकमेंकाना ट्रोल करत आहेत.
meme template tou apne use karo https://t.co/aBzV1fn8Jt
— zomato (@zomato) September 5, 2022
अटीतटीच्या सामन्यात भारताचा पाच विकेट्सनं पराभव; विराटचं अर्धशतक व्यर्थ
नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघानं सहा विकेट्स आणि एक चेंडू राखून भारताचा पाच विकेट्सनं पराभव केला. भारतानं दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बाबर 14 धावा करून बाद झाला. फखर जमाननं 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोक्याची क्षणी मोहम्मद नवाजनं पाकिस्तानसाठी 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. यानंतर आसिफ अली आणि खुशदिल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 17 चेंडूंत 33 धावांची भागीदारी झाली. मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं पाकिस्तानसाठी 51 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं भारताला पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि रवि बिश्नोईनं यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेली भारतीय सलामी जोडी केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. पण पॉवरप्लेपूर्वी कर्णधार रोहित (28) रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतानं पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शादाबच्या चेंडूवर बाद झाला. त्यानं 28 धावा केल्या. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं भारताचा डाव सावरला. परंतु, 10 व्या षटकात नवाजने सूर्यकुमार यादवच्या (13 धावा) रुपात भारताला चौथा धक्का दिला. या सामन्यातही ऋषभ पंतला काही खास कामगिरी करता आली नाही. शादाबने पंतला (14) बाद करून दुसरी विकेट मिळवली. पाकिस्तानविरुद्ध गट सामन्यात धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यामुळं भारताचा निम्मा संघ 132 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.