Mohammad Amir : हार्दिक पांड्याच्या ट्वीटवर मोहम्मद आमिरच्या प्रतिक्रियेनं जिंकली सर्वांची मनं, नक्की काय म्हणाला पाकिस्तानचा गोलंदाज
Mohammad Amir : मोहम्मद आमिर हा पाकिस्तानचा आघाडी गोलंदाज होता. पण मॅच फिक्सिंगमध्ये त्याचं नाव आल्यानंतर त्याची क्रिकेट कारकिर्दचं जणू खुंटली आहे.
Mohammad Amir Reaction on Hardik Pandya's Tweet : भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये (India vs Pakistan) दोन्ही संघातील खेळाडूंची एकमेंकाविरुद्धती आक्रमक वृत्ती चांगलीच चर्चेत असते. पण अलीकडे दोन्ही संघाचे खेळाडू अगदी खेळीमेळीच्या वातावरणात वावरताना दिसतात. दरम्यान हार्दिकच्या एका ट्वीटला पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने दिलेला रिप्लायही अनेकांची मनं जिंकत असून दोन्ही संघामधील खेळाडू फिल्डच्या बाहेर एकमेंकांशी चांगलं नातं जपून आहेत, हे दिसून येत आहे.
तर आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला5 गडी राखून मात दिली. या रोमहर्षक सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने विजयानंतर एक हटके ट्वीटही केलं होतं. ज्यामध्ये त्याने सामना जिंकल्यानंतरचा एक फोटो पोस्ट केला असून सोबत त्याच मैदानावरील आशिया कप 2018 मधील त्याचाच एक फोटो पोस्ट केला होता. एका फोटोत हार्दिक दुखापतीमुळे स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जात होता, तर दुसऱ्या फोटोत त्याच मैदानावर त्याने दमदार खेळ करुन विजय मिळवला होता. दरम्यान हार्दिकच्या या ट्वीटला रिट्वीट करत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने (Mohammad Amir) खूप चांगलं खेळलास भावा (Well played brother) अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आमिरच्या ही प्रतिक्रिया तुफान व्हायरल होत असून अनेकजण कमेंट लाईक करत असून त्यावर रिप्लायही देत आहेत.
पाहा ट्वीट -
Well played brother 👏 https://t.co/j9QPWe72fR
— Mohammad Amir (@iamamirofficial) August 29, 2022
फिक्सिंगमुळे मोहम्मदच्या करीअरला ब्रेक
मोहम्मद आमिर हा एक डावखुरा गोलंदाज आहे. एकेकाळी तो पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज असायचा. फिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. 2020 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेत तो मैदानात परतला. मात्र, अद्यापपर्यंत त्याचा पुन्हा राष्ट्रीय संघात समावेश झालेला नाही.
हे देखील वाचा-