IND vs PAK: 'तेरा भाई संभाल लेगा..' अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या हार्दिक पांड्याची रिएक्शन व्हायरल
Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आशिया चषकातील दुसरा पार पडला. या सामन्यात भारतानं पाच विकेट्सनं बाजी मारली.
Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आशिया चषकातील दुसरा सामना पार पडला. या रोमहर्षक सामन्यात कोण बाजी मारेल? हे अखेरच्या षटकापर्यंत सागणं कठीण होतं. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूत फक्त एक धाव निघाली. या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. पण या षटकार मारण्यापूर्वी हार्दिक पांड्यानं दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
दरम्यान, पाकिस्ताननं दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात 21 धावांची गरज होती. परंतु, 19 व्या षटकात भारतानं तीन चौकारांसह 14 धावा काढल्या. ज्यामुळं अखेरच्या षटकात भारताला फक्त सात धावांची आवश्यकता होती. परंतु, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात जाडेजा आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकनं एक धाव काढत स्ट्राईक हार्दिक पांड्याला दिली. परंतु, तिसरा चेंडू निर्धाव गेल्यानं चाहत्यांची धाकधूक वाढली. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
व्हिडिओ-
पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया
"अशा लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्ही नेहमी ओव्हर बाय ओव्हर प्लॅन करता. मला माहित होतं की, समोर एक तरुण गोलंदाज आहे आणि डावखुरा फिरकीपटू देखील आहे. अखेरच्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाज जास्त दडपणाखाली असेल. मी जास्त प्रेशर घेतला नाही. आम्हाला शेवटच्या षटकात फक्त 7 धावा हव्या होत्या. एवढंच नव्हे तर, अखरेच्या षटकात 15 धावां काढायच्या असत्या तरीही मी ते केलं असतं.
हार्दिक ठरला सामनावीर
हार्दिकनं फलंदाजीत धडाकेबाज खेळ करण्यापूर्वी गोलंदाजीतही कहर केला होता. या सामन्यात त्यानं चार षटकात 25 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. हार्दिकनं मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद आणि खुशदिल शाह यांची विकेट घेतली. यावर हार्दिक म्हणाला की, 'गोलंदाजीमध्ये परिस्थितीचं आकलन करणं आणि शस्त्रे वापरणे महत्त्वाचे आहे. लहान आणि कठोर लांबीची गोलंदाजी माझी ताकद आहे. माझे लक्ष त्यांना चांगले देणे आणि फलंदाजांना चुका करण्याची संधी देणे यावर होते.
हे देखील वाचा-