Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये पाकिस्तानवर भारताचा दबदबा, पाहा आकडेवारी
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये 14 वेळा आमने-सामने आले आहेत. अशामध्ये टीम इंडियाचाच दबदबा दिसून आला आहे.
Asia Cup 2022 : क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan). दोन्ही संघ एकमेकांचा दौरा करत नसल्याने दोघेही मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच आमने-सामने येतात. आता आशिया चषकात (Asia Cup 2022) 28 ऑगस्ट रोजी भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी आतापर्यंत दोन्ही संघाचा आशिया कपमधील इतिहास जाणून घेऊ...
आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan in Asia Cup) 14 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. यावेळी भारतीय संघाचंच पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे. भारताने पाकिस्तानला या 14 पैकी 8 सामन्यांत धुळ चारली आहे. तर पाकिस्तान देखील 5 सामने जिंकण्यात यशस्वी राहिला आहे. याशिवाय 1997 मध्ये पार पडलेल्या एका सामन्याचा निर्णय न लागला नसल्याचंही समोर आलं आहे.
कधी, कुठं रंगणार यंदीचा भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-