एक्स्प्लोर

IND vs PAK : 'फरहाननं AK-47 चालवली तर भारतानं ब्रह्मोसचा मारा केला' पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं आपल्याचं टीमला सुनावलं

IND vs PAK : आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं. या सामन्यात साहिबजादा फरहाननं केलेली फायरिंग स्टाईल ॲक्शन वादात आली होती.

नवी दिल्ली : आशिया चषकातील सुपर फोरच्या लढतीत भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाज करताना 171 धावा केल्या. दुबईच्या मैदानावर ही धावसंख्या विजयासाठी पुरेशी मानली जाते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील भारतीय संघानं सहजपणे पाकिस्तानवर विजय मिळवला. 

भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 59 बॉलमध्ये 105 धावांची भागीदारी केली. गिलनं 47 धावा केल्या तर अभिषेक शर्मानं  39 बॉलमध्ये 74 धावा केल्या. अभिषेक शर्मानं त्याच्या वादळी खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. दोघे बाद होईपर्यंत मॅच भारताच्या हातात आली होती.  तिलक वर्मानं 30 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.  

भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून  साहिबजादा फरहान यानं 58 धावा केल्या. फरहान यानं अर्धशतक केल्यानंतर गनशॉट सेलीब्रेशन केलं. त्याच्या या कृतीवर अनेकांनी टीका केली. अनेक माजी खेळाडूंनी आक्षेप घेत आरोप केले की त्यानं पहलगाममधील निरपराध मृतांची खिल्ली उडवली. मात्र, फरहान  यानं ते आरोप फेटाळले आहेत. 

दानिश कनेरियाचं पाकिस्तानवर टीकास्त्र

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानं पाकिस्तानच्या लाजीरवाणया पराभवावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गिल आणि अभिषेक यांच्या फलंदाजीमुळं पाकिस्तानच्या टीमला धक्का बसला. कनेरियानं आयएनएस सोबत बोलताना म्हटलं की, 'साहिबजादा फरहाननं AK-47 ची  ॲक्शन केली मात्र शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानं त्यांच्या बॅटनं ब्रह्मोसचा मारा केला. शर्मानं तर फ्लाइंग किस देखील दिला, हेच खरं उत्तर आहे. भारतीय सलामीवीरांचा प्रतिहल्ला इतका जोरात होता की पाकिस्तानी खेळाडू हतबल झाले. धुलाई आणि महाधुलाईत फरक असतो, ही महाधुलाई होती', असं कनेरिया म्हणाला. 

कनेरियानं फकर जमानच्या विकेटसंदर्भात बोलताना म्हटलं की तो आऊट होता. पाकिस्ताननं विनाकारण वाद निर्माण केल्याचा आरोप कनेरियानं केला. पाकिस्तान आता आणखी एक कारण शोधेल, आता रडगाणं गातील फखर जमान बाद नव्हता, मात्र तो स्पष्ट पणे कॅछ होता. संजू सॅमसनचे ग्लोव्ज बॉलच्या खाली होती. पाकिस्तान रडगाणं सुरु ठेवेल आणि बेनेफिट ऑफ डाऊटचा विषय काढतील, असं दानिश कनेरिया म्हणाला. 

दरम्यान, आता आशिया चषकात पाकिस्तानला आव्हान कायम ठेवायचं असल्यास श्रीलंका आणि बांगलादेशवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. बांगलादेश आणि भारतानं सुपर फोरमध्ये एक एक सामना जिंकला आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Embed widget