(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहली रचणार इतिहास!
Asia Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या कट्टर प्रतिद्वंद्वी संघात रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022 मधील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.
Asia Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या कट्टर प्रतिद्वंद्वी संघात रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022 मधील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. दुबईच्या (Dubai) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद होणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. त्यानं याआधीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 हून अधिक सामने खेळले आहेत. आत्तापर्यंत त्यानं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 99 सामने खेळले आहेत.
ट्वीट-
आंतराष्ट्रीय कारकिर्दीत 23 हजारांहून अधिक धावा
विराटनं आतापर्यंत 463 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 23,718 धावांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 102 सामन्यांमध्ये 8,074 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 262 सामन्यांमध्ये 12,344 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्यानं आंतरराष्ट्रीय 99 टी-20 सामन्यांमध्ये 3,308 धावा केल्या आहेत. त्यानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 70 शतके झळकावली आहेत. यामध्ये कसोटीतील 27 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप एकही शतक झळकावता आलं नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 94 इतकी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 14 वर्ष पूर्ण
क्रिकेट जगात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या विराट कोहलीला 18 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 14 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. त्यानं 18 ऑगस्ट रोजी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कोहलीचं केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहे. तसेच इंस्टाग्रामवर 200 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला तो एकमेव क्रिकेटर आहे. 14 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत.
71 व्या शतकाची प्रतिक्षा
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून त्याच्या कारकिर्दीतील खराब टप्प्यातून जावा लागत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. तर, गेल्या सहा महिन्यापासून त्याला 50 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचं फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे.
हे देखील वाचा-