Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी फक्त विराटची चर्चा! केएल राहुलनंतर सौरव गांगुलींची मोठी प्रतिक्रिया
India Vs Pakistan, Asia Cup 2022: आशिया चषकाला आजपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत.
India Vs Pakistan, Asia Cup 2022: आशिया चषकाला आजपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) विराट कोहलीच्या फॉर्मबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय.
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून त्याच्या कारकिर्दीतील खराब टप्प्यातून जावा लागत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. तर, गेल्या सहा महिन्यापासून त्याला 50 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचं फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे.
ट्वीट-
सौरव गांगुली काय म्हणाले?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमात भारत-पाकिस्तान सामन्यासह इतर मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. त्यावेळी सौरव गांगुलींनी विराट कोहलीच्या फॉर्मबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय. विराट कोहली एक महान खेळाडू आहे. धावा काढण्याचा त्याचा स्वतःचा फॉर्म्युला आहे. तो लवकरच फॉर्ममध्ये येईल, याची आम्ही अपेक्षा करतोय. विराटनं फक्त संघासाठीच नव्हे तर, स्वत:साठीही धावा करणं खूप महत्वाचं आहे.
आशिया चषकापूर्वी भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंचं फोटोशूट
आशिया चषकापूर्वी पाकिस्तान संघानं (Pakistan Cricket Team) देखील आपल्या नवी-कोरी जर्सीचं अनावरण करत दुबईत फोटोशूट केलं आहे. या सर्वाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या ट्वीटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू देखील फोटोशूटदरम्यान मस्ती करताना आणि विविध गेम्स खेळताना दिसत आहेत.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
हे देखील वाचा-