Asia Cup 2022: शाकिब अल हसनची ‘ऑलराऊंड’ कामगिरी! ब्राव्होनंतर 'अशी' कामगिरी करणारा दुसरा क्रिकेटपटू
SL vs BAN, Asia Cup 2022: आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशवर (Sri Lanka vs Bangladesh) दोन विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
SL vs BAN, Asia Cup 2022: आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशवर (Sri Lanka vs Bangladesh) दोन विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’चा परिस्थिती असणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेनं अखेर बाजी मारली. या विजयासह सुपर- 4 मध्ये पोहोचणारा श्रीलंका हा तिसरा संघ ठरलाय. तसेच बांगलादेशच्या संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार व अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसननं (Shakib Al Hasan) टी20 क्रिकेटचा इतिहासातील एक मैलाचा दगड पार केलाय. टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा आणि 400 विकेट्स मिळवणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरलय.
दरम्यान, वेस्ट इंडीजचा स्टार ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो हा टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा आणि 400 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला क्रिकेटपटू आहे. ड्वेन ब्राव्होनं त्याच्या टी-20 क्रिकेटच्या कारकार्दीत आतापर्यंत 549 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 6 हजार 871 धावा आणि 605 विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होनं वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त आयपीएल, सीपीएल, पीएसएल, हंड्रेड इत्यादी लीग खेळल्या आहेत. तर, शाकीबनं 369 टी-20 सामन्यात 6 हजार 19 धावांचा टप्पा गाठलाय. तर, 419 विकेट्स घेतल्या आहेत. शाकिब बांगलादेशसह आयपीएल, सीपीएल, बीपीएल इत्यादी टी20 लीग खेळतो.
ट्वीट-
टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा आणि 400 हून अधिक विकेट्स
क्रमाकं, नाव, सामने, धावा विकेट्स
क्रमांक | नाव | सामने | धावा | विकेट्स |
1 | डे्वन ब्राव्हो | 549 | 6 हजार 871 | 605 |
2 | शाकीब अल हसन | 369 | 6 हजार 19 | 419 |
थरारक सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशचा विजय
आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर बांगलादेशच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्त्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं दोन विकेट्स राखून हा सामना जिंकला. याविजयासह श्रीलंकेच्या संघानं सुपर-4 मध्ये एन्ट्री केलीय. तर, बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.
हे देखील वाचा-