IND vs INA, Asia Cup Hockey : भारतीय संघाची अद्भुत, अविश्वसणीय खेळी, इंडोनेशियावर 16-0 ने विजय, सुपर 4 मध्ये थेट एन्ट्री
भारतीय हॉकी संघाने आशिया कपमध्ये आज झालेल्या सामन्यात इंडोनेशियाला 16-0 ने मात देत थेट सुपर 4 मध्ये एन्ट्री मिळवली असून यामुळे पाकिस्तान संघाचं स्पर्धेतील आव्हानही संपलं आहे.
India vs Indonesia Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघाने आज एका अद्भुत, अविश्वसणीय खेळीचं दर्शन घडवलं आहे. हिरो हॉकी आशिया कपच्या (Hero Asia Cup 2022) तिसऱ्या सामन्यात यजमान इंडोनेशिया संघाला 16-0 च्या मोठ्या फरकाने मात देत भारताने थेट सुपर 4 अर्थात पुढील फेरीत एन्ट्री मिळवली आहे. इंडोनेशियात सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध अनिर्णीत सोडल्यानंतर, जपानविरुद्ध 5-2 ने पराभव देखील मिळवला होता. त्यामुळे आज स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज होती. त्यानुसार भारताने 16-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत एन्ट्री मिळवली आहे.
आतापर्यंतच्या स्पर्धेत भारत
या स्पर्धेत दोन पूल असणार आहेत. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून एका गोलची आघाडीू कायम ठेवली होती. पण अखेरच्या काही मिनिटांत पाककडून गोल करण्यात आल्याने सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या सामन्यात मात्र जपानने सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. भारताने महत्त्वपूर्ण दोन गोल केले पण तोवर जपानने आघाडी वाढवल्याने अखेर भारत 5-2 ने पराभूत झाला. त्यानंतर आज भारताने 16-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे.
हे देखील वाचा-
- Ind vs Jpn, Asia Cup Hockey : जपानविरुद्ध भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी, 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव
- Ind vs Pak, Asia Cup Hockey : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अनिर्णीत, अखेरच्या मिनिटांत पाकचा अप्रतिम गोल
- IPL 2022 : बंगळुरु संघाने मोडला कोलकात्याचा नकोसा विक्रम, क्वॉलीफायरमध्ये पोहोचूनही ओढवली 'ही' नामुष्की