एक्स्प्लोर

Anam Mirza on Saniya Mirza : "तिला खासगी आयुष्य जगू द्या", सानिया मिर्झाच्या बहिणीने केले आवाहन

Anam Mirza on Saniya Mirza : टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर शोएब मलिकच्या नात्यात अंतर पडलय. शोएब मलिकने शनिवारी (दि.21) तिसरा विवाह केलाय. त्यामुळे सानिया मिर्झाच्या आयुष्याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Anam Mirza on Saniya Mirza : टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर शोएब मलिकच्या नात्यात अंतर पडलय. शोएब मलिकने शनिवारी (दि.21) तिसरा विवाह केलाय. त्यामुळे सानिया मिर्झाच्या आयुष्याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आता सानिया मिर्झाची बहिण तिच्यासाठी मैदानात उतरली आहे. "तिला तिचे खासगी आयुष्य जगू द्या", असे आवाहन अनम मिर्झा हिने केले आहे.  तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

अनम मिर्झा म्हणाली, "सानियाने तिचे व्यक्तिगत आयुष्य लोकांपासून वेगळे ठेवले आहे. मात्र, आता तिला शोएब आणि ती वेगळे होणार आहेत, हे जाहिरपणे सांगणे क्रमप्राप्त आहे. तिने शोएबला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. तिच्या आयुष्यातील ही संवेदनशील वेळ आहे. त्यामुळे मी चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करते की, तिचे हे खासगी आयुष्य आहे. तिला व्यवस्थितपणे राहू द्या", असे आवाहन सानियाच्या बहिनीने केले आहे. 

सानियाचे वडिल काय म्हणाले? 

सानिया मिर्झाचे वडिल इम्रान मिर्झा यांनी शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत आणि घटस्फोटाबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, दोघेही संमतीने वेगळे झाले आहेत. हा "खुला" आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिका सना जावेदला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. शोएब मलिकने गेल्या वर्षी सना जावेदला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान, विवाह झाल्यानंतर सना जावेदने इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे नावही बदलले आहे. 'सना शोएब मलिक' असे नाव तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला दिले आहे. शोएब मलिकचा हा तिसरा विवाह आहे. 

सानियाच्या वडिलांनी सांगितलेला 'खुला' काय असतो?

कुराण आणि हदीसमधील नियमांनुसार, घटस्फोट आणि खुला यामध्ये मोठा फरक नसतो. एखादी महिला जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेते. तेव्हा त्याला खुला म्हटले जाते. तर वेगळे होण्याचा निर्णय पुरुषाने घेतला तर त्याला 'तलाक' म्हटले जाते. 'तलाक' घेतल्यानंतर महिला सलग 3 महिने आपल्या पतीच्या घरी राहते. कुराण आणि हदीसमध्ये याचा उल्लेख आहे. सानियाच्या वडिलांनी स्पष्ट केलय की, तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच हा खुला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Deepika In Bollywood : दीपिकाच्या 'फायटर'मधील त्या सीनची चर्चा, पण यापूर्वी बोल्ड सीन देण्यात कधीच सुट्टी दिलेली नाही! चित्रपटावरुनही झाला होता वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget