All England Open 2022 Finals: तब्बल 21 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटनची मोठी स्पर्धा जिंकण्याची संधी
All England Open 2022 Finals: ऑल इंग्लंड ओपन 2022 स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवलीय.
All England Open 2022 Finals: ऑल इंग्लंड ओपन 2022 स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवलीय. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्यान मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. भारतानं 21 वर्षापूर्वी इंग्लंड ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ही स्पर्धा जिंकता आली नाही. दरम्यान, लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी (Viktor Axelsen) भिडणार आहे. लक्ष्य सेन याच्याकडं 21 वर्षाचा दुष्काळ संपवण्याची संधी उपलब्ध झालीय. यामुळं यंदाच्या इंग्लंड ओपन स्पर्धेत लक्ष्य सेन कशी कामगिरी बजावतोय? याकडं सर्वांचं लक्ष्य लागलंय.
1947 मध्ये प्रकाश नाथ, 1980 आणि 1981 मध्ये प्रकाश पदुकोण आणि 2001 मध्ये पुलेला गोपीचंद आणि 2015 मध्ये सायना नेहवाल यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये तर, पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये इंग्लंड ओपन स्पर्धेचा खिताब जिंकला होता. लक्ष्यनं अंतिम सामना जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल.
ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना आज (20 मार्च) भारतीय वेळेनुसार 07.30 वाजता खेळवला जाईल. लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यातील हा मोठा सामना बर्मिंघम, यूके येथील युटिलिटी एरिना येथे खेळवला जाईल. हा सामना VH1, MTV आणि History TV18 चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट सिलेक्ट अॅपवर पाहता येईल.
हे देखील वाचा-
- Men's Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव, शूटआऊटमध्ये लागला थरारक सामन्याचा निकाल
- Archery:आशिया चषकमध्ये भारताची चमकदार कामगिरी, तिरंदाजीत 2 सुवर्ण आणि 6 रौप्यपदक जिंकले
- Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीला रॉजर फेडरर आला धावून, 60 लाख विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha