एक्स्प्लोर
मॅचसोबतच रहाणेने क्रिकेट रसिकांची मनंही जिंकली
पहिलीच कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला टीम इंडियाच्या विजयी जल्लोषात सामील करुन घेत कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळभावनेचं अनोखं दर्शन घडवलं.
बंगळुरु : अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तावर विक्रमी विजय साजरा केला. पण त्यानंतर कर्णधार राहणेनं पहिलीच कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला टीम इंडियाच्या विजयी जल्लोषात सामील करुन घेत खेळभावनेचं अनोखं दर्शन घडवलं.
टीम इंडियाचं विजयी करंडकासह फोटो सेशन सुरु असतानाच रहाणेनं अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पुढे येण्याची विनंती केली. त्यानंतर दोन्ही संघांनी कॅमेरासमोर एकत्रित पोझ दिली. त्यामुळे भारतानं हा सामना तर जिंकलाच पण खिलाडूवृत्तीमुळे अफगाणी खेळाडूंबरोबरच तमाम क्रिकेटरसिकांची मनंही जिंकली.
बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच भारतानं अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवत विक्रमी विजय साजरा केला. धवन आणि मुरली विजयच्या शतकी खेळींमुळे भारतानं पहिल्या डावात 474 धावा उभारल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानं अक्षरश: लोटांगण घातलं.
भारतानं अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला. 365 धावांची भली मोठी आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर अफगाणिस्तान दुसरा डाव 103 धावांत आटोपला.
एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी केली. भारताकडून रविंद्र जाडेजानं दोन्ही डावांत मिळून सहा तर अश्विननं पाच फलंदाजांना माघारी धाडलं.
संबंधित बातम्या :
कसोटी क्रिकेटमध्ये उमेश यादवच्या 'शंभर नंबरी' विकेट्स
बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया विजयरथावर स्वार
अफगाणिस्तानला 109 धावांत गुंडाळलं, फॉलोऑनची नामुष्की भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement