(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AIFF Ban : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, फिफा लवकरच AIFF वरील बंदी उठवण्याची शक्यता
FIFA ban AIFF : फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (AIFF) निलंबनाची कारवाई केली असून आता यासंबधी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे.
FIFA Ban on AIFF : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेल्या बंदीच्या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिफा लवकरच भारतीय फुटबॉलवरील बंदी उठवू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. भारतीय फुटबॉल महासंघात (AIFF) तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली होती.
एआयएफएफवर बंदी घातल्यानंतर, फिफाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भारतीय फुटबॉल क्लब्सना परदेशातील स्पर्धांत खेळणं अवघड झालं होतं. पण आता समोर येणाऱ्या माहितीनुसार AIFF वरील ही बंदी हटवली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिफा आपल्या निर्णयावर पुनर्विचार करत आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने देखील याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
FIFA ban on AIFF ( All India Football Federation) likely to be overturned soon: Top government sources
— ANI (@ANI) August 26, 2022
बंदीमागील नेमकं कारण काय?
भारतीय फुटबॉलमध्ये सुरू झालेला संपूर्ण वाद एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावरुन सुरु झाला आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही निवडणूक न घेताच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ते बसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. प्रफुल्लचा कार्यकाळ 2009 पासून सुरू झाला, जो 2020 मध्ये संपला. असे असतानाही ते अजूनही अध्यक्षपदी आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. न्यायालयाने मे 2022 मध्ये संपूर्ण बोर्ड रद्द केले होते आणि नवीन घटना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यानंतरही योग्य निर्णय न झाल्याने फिफाने ही बंदी घातली आहे.
फिफा काय आहे?
International Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.
हे देखील वाचा-