एक्स्प्लोर
VIDEO : कर्णधाराची कॅप काढल्यावर धोनीची डॅडीज् ड्यूटी
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी लाडकी लेक झिवाचे केस वाळवतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे

मुंबई : बाबा कितीही दमलेला असला, तरी घरी आल्यावर त्याला लाडक्या राजकन्या किंवा राजपुत्रांसाठी सुपरहिरो व्हावंच लागतं. मग तो बाबा रोज कामावर जाणारा सर्वसामान्य नोकरदार असो, किंवा मोठा सेलिब्रेटी, हे 'बाबा'पण काही त्याला चुकत नाही. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही लाडकी लेक झिवासाठी डॅडीची ड्यूटी बजावावी लागलीच. महेंद्रसिंग धोनीने आधी अंबाती रायुडू आणि मग ड्वेन ब्राव्होच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आक्रमणावर चढवलेल्या हल्ल्याने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या सामन्यात एक सनसनाटी विजय मिळवून दिला. धोनीने 34 चेंडूंमध्ये एक चौकार आणि सात षटकारांचा पाऊस पाडून नाबाद 70 धावांची खेळी उभारली. सामना संपला, मग पुरेशी झोपही झाली आणि त्यानंतर धोनीला पुन्हा स्वीकारावी लागली ती एका डॅडीची ड्यूटी. या ड्युटीचा व्हिडिओ धोनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आंघोळीनंतर झिवाचे ओले केस वाळवण्याची जबाबदारी धोनी आनंदाने पार पाडत आहे. हेअर ड्रायरच्या मदतीने धोनी लेकीचे केस सुकवत आहे, तर झिवाही कौतुकाने आपल्या बाबांकडून लाड करुन घेत आहे. पाहा व्हिडिओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























