कुंबळेचा साथीदार आणि टीम इंडियातील माजी क्रिकेटर सेहवागनं जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेव्हा कुंबळेच्या जबड्याला मार लागला होता त्यानंतरही त्यानं केलेली गोलंदाजी ही टीम इंडियाच्या खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
2/5
भज्जीनं देखील कुंबळेला कोच झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
3/5
तुम्ही आमच्यासोबत बराच वेळ कोच म्हणून असाल अशी आशा शिखर धवननं व्यक्त केली आहे.
4/5
टीम इंडियाचा कसोटी संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं कुंबळेला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. "अनिल कुंबळे सर आपलं हार्दिक स्वागत, तुम्ही आमच्यासोबत असणार यामुळे फारच उत्साहित आहे. तुम्ही सोबत असल्यानं भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी होतील.
5/5
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अनिल कुंबळेला भारतीय संघाचा नवा कोच म्हणून नियुक्त करण्यातं आलं आहे.