एक्स्प्लोर
आयसिसला उद्धवस्त करण्यासाठी अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात मोठा बॉम्ब हल्ला

1/5

अफगाणिस्तानमधील आयसिसची ठिकाणं उध्वस्त करणं अमेरिकेचा उद्देश होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे गेल्या काही दिवसात अनेक जवान मारले गेले. त्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचललं. भूमीगत ठिकाणं उध्वस्त करण्याच्या हेतूने हा बॉम्ब तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आयसिसचं ज्या गुहांमध्ये उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने हा बॉम्ब वापरला.
2/5

अमेरिकेचं सैन्य मुख्यालय पेंटागनने या हल्ल्यानंतर माध्यमांना माहिती दिली. जगात पहिल्यांदाच या शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकन फायटर MC-130 च्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या नंगारहर भागातील आयसिसच्या गुहांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही, अशी माहिती पेंटागनचे प्रवक्ते अॅडम स्टंप यांनी दिली.
3/5

अफगाणिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा हल्ला करण्यात आला. आयसिसचा सुळसुळाट असलेल्या भागात अमेरिकेने हल्ला केला. MOAB हा जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब अमेरिकेने वापरला आहे. आयसिसचे ठिकाणं उध्वस्त करणं या हल्ल्यामागचा उद्देश होता, असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेन मिलीट्री सध्या नुकसानीची पाहणी करत आहे. MOAB चा वापर जगात पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
4/5

अमेरिकन मिलीट्रीने अफगाणिस्तानवर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील आयसिस स्टेटमध्ये अमेरिकेने हा हल्ला केल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिलं आहे.
5/5

MOAB म्हणजे ‘Mother of All Bombs’ हा जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब म्हणून ओळखला जातो. याला GBU-43/B या नावाने ओळखलं जातं. 11 टन वजनाची शस्त्रे या MOAB असून याचं वजन 9 हजार 797 किलो म्हणजे जवळपास 100 टन एवढं असल्याचं बोललं जातं. वायू दलाने हा बॉम्ब 2003 साली तयार केला, पण आतापर्यंत याचा वापर कधीही करण्यात आला नव्हता.
Published at : 14 Apr 2017 12:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
