एक्स्प्लोर
'सुलतान'ची रेकॉर्डब्रेक कमाई

1/9

ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सुलतान सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. 'सुलतान'ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. 'सुलतान' 36.54 कोटींसह यंदाच्या वर्षात पहिल्या दिवसात सर्वात मोठी कमाई सिनेमा ठरला आहे.
2/9

7) सुलतान सिनेमासाठी 90 कोटींचा खर्च आला आहे. हा सिनेमा किमान चार आठवडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.
3/9

पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये 'सुलतान'ने 6 रेकॉर्ड मोडले आहेत.
4/9

3) 'सुलतान' रिलीज होण्यापूर्वीच तीन दिवसांपासून अॅडव्हान बुकिंग सुरु होतं. सुमारे 20 कोटी रुपये अॅडव्हान्स बुकिंगमधून जमा झाले होते. यापूर्वी बजरंगी भाईजानसाठी मोठ्या प्रमाणात अॅडव्हान बुकिंग झालं होतं. त्याचा रेकॉर्ड 'सुलतान'ने मोडला आहे.
5/9

6) आतापर्यंत बुधवारी सलमानचे दोन सिनेमे रिलीज झाले आहेत. सुलतानपूर्वी एक था टायगर बुधवारी रिलीज झाला होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी 3.93 कोटीची कमाई केली होती.
6/9

5) यापूर्वी सलमानच्या प्रेम रतन धन पायो सिनेमाने पहिल्या दिवशी 40.35 कोटी कमाई केली होती. त्यानंतर सुलतानचा नंबर लागला आहे.
7/9

1) या सिनेमाने शाहरुखच्या 'फॅन'च्या पहिल्या दिवसाईच्या कमाईपेक्षा जवळपास दुप्पट कमाई केली आहे. फॅनने 19.20 कोटी कमावले होते.
8/9

2) ईदला रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये 'सुलतान' हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी शाहरुखच्या चेन्नई एक्प्रेस सिनेमाने 33.1 कोटी कमावले होते.
9/9

4) स्पोर्ट्सवर आधारित सिनेमाने पहिल्या दिवशी जेवढी कमाई केली, त्यापेक्षा अधिक कमाई 'सुलतान'ने केली आहे. यापूर्वी 'भाग मिल्खा भाग'ने 9 कोटी तर प्रियांका चोप्राच्या 'मेरी कोम'ने 8.4 कोटी कमावले होते.
Published at : 07 Jul 2016 03:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रीडा
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
