एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक खेळाडू बार्शीकन्येची भव्य मिरवणूक

1/6

शहरातील विविध संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी प्रार्थनाच्या ऑलिम्पिक निवडीनिमित्त शुभेच्छांचे फलकही शहरात लावले आहेत.
2/6

प्रार्थनाचं मुंबईहून रविवारी रात्री बार्शीत उशिरा आगमन झालं आहे. त्यानंतर सोमवारी तिच्या सुभाषनगरमधल्या राहत्या निवासस्थानातून प्रार्थनाची शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.
3/6

सानिया मिर्झानं रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत प्रार्थनासोबत खेळण्याची इच्छा असल्याचं अखिल भारतीय टेनिस संघटना अर्थात आयटालाला कळवलं होतं. 2014 साली इन्चिऑन इथं झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनानं सानियाच्या साथीनं कांस्यपदक मिळवलं होतं.
4/6

5/6

फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या आयटीएफ महिलांच्या खुल्या स्पर्धेत तिने 25 हजार डॉलर्सचे विजेतेपदही पटकावलं आहे. दुहेरीतील वर्ल्ड रँकिंगमध्येही ती 186 व्या स्थानावर आहे. 21 वर्षीय प्रार्थनानं आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदं मिळवली आहेत.
6/6

रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघात निवड झालेली बार्शीची कन्या प्रार्थना ठोंबरेचा आज नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात बार्शी नगरपरिषदेच्या वतीने आमदार दिलीप सोपल आणि जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते प्रार्थनाचा सत्कार करुन तिला मानपत्र प्रदान करण्यात येईल.
Published at : 27 Jun 2016 05:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
