टी20 क्रिकेटमध्ये धोनीच्या नावे 40 झेल आणि 21 स्टम्पिंग आहेत. तर अकमलच्या नावे 28 झेल आणि 32 स्टम्पिंग आहेत.
2/5
धोनीनं पाकिस्तानच्या कामरान अकमलला पाठी टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्याआधी धोनी आणि अकमल दोघांचा नावावर 60 विकेट होत्या. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनीनं विकेटच्या मागे कॅच घेऊन अकमलला मागे टाकलं.
3/5
मात्र, यंदा कर्णधार धोनीच्या नावे जो विक्रम आहे. तो टी-20 मधील सर्वश्रेष्ठ असा विक्रम आहे. धोनी विकेटकिपर म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात श्रेष्ठ विकेटकिपर बनला आहे.
4/5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचं योगदान फारच मोठं आहे. त्यामुळे मैदानात उतरताच त्याच्या नावावर कोणता तरी विक्रम होतोच.
5/5
झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० सामन्यात भारताचा अवघ्या 2 धावांनी पराभव झाला असला तरीही कर्णधार धोनीनं मात्र एक नवा विक्रम रचला आहे.