नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर काल (बुधवारी) पॉप स्टार जस्टीन बिबरचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी तुफान गर्दीही झाली होती. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक बड्या सेलिब्रिटींनीही गर्दी केली होती. तसेच मोठ्या पडद्यावरुन गायब झालेल्या काही अभिनेत्रीही यावेळी पाहायला मिळाल्या.