एक्स्प्लोर
मुंबईतील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये ‘अग्नितांडव’

1/7

कमला मिल्स कम्पाऊंड दक्षिण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. अनेक वृत्त वाहिन्या, रेडिओची कार्यालयं या कम्पाऊंडमध्ये आहेत. अत्यंत अलिशान अशी 42 रेस्टॉरंट आणि पबही इथे आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर उच्चभ्रू वस्तीतील तरुण-तरुणींची गर्दी या भागात मोठी असते. पब असल्याने तरुणांची रात्री उशिरापर्यंत इथे वर्दळ असते. त्याचसोबत, काही सरकारी कार्यलयं आणि बॅंकाही या कम्पाऊंडमध्ये आहेत.
2/7

आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
3/7

हॉटेल मोजो बिस्त्रोच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4/7

मृतांची नावं : प्रमिला, तेजल गांधी (वय वर्षे 36), खुशबू बन्सल, विश्वा ललानी (वय वर्षे 23), पारुल लकडावाला (वय वर्षे 49), धैर्य ललानी (वय वर्षे 26), किंजल शहा (वय वर्षे 21), कविता धरानी (वय वर्षे 36), शेफाली, यशा ठक्कर (वय वर्षे 22), सरबजीत परेला, प्राची खेतानी (वय वर्षे 30), मनिषा शहा (वय वर्षे 47), प्रीती राजगीरा (वय वर्षे 41)
5/7

या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
6/7

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
7/7

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला भीषण आग लागली आहे.
Published at : 29 Dec 2017 07:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
