एक्स्प्लोर
शिक्षणासाठी संघर्ष : कंबरभर पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
1/5

गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या रस्त्याची ही समस्या जैसे थे आहे. एकीकडे समृद्धी महामार्गासाठी वाट्टेल ते करुन खासगी जमिनी घेण्यात आल्या. मात्र दुसरीकडे याच महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेले बांगरवाडीत मात्र तुमच्याकडून गावातल्या रस्त्याचाही प्रश्न सुटत नसेल, तर ती समृद्धी काय कामाची? याचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे.
2/5

हा भाग मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात येत असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात. भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याकडे अनेकदा इथले टेम्पोभर लोक रस्त्याच्या समस्येसाठी गेले आहेत. मात्र दरवेळी एकच समस्या घेऊन का येता? असं आमदारांचं उत्तर असल्याचा दावा ग्रामस्थ करतात.शिवाय हे नेते गावात फक्त निवडणुकीपुरतेच दिसतात, असाही आरोप ग्रामस्थांचा आहे. तर हा रस्ता खासगी जागेतून जात असल्याने कामात अडचणी येत असल्याचा गावच्या ग्रामसेवकाचा दावा आहे.
Published at : 11 Jul 2019 01:28 PM (IST)
View More























