एक्स्प्लोर
देशातील या मंदिरात पुरुषांना प्रवेश नाही!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30054107/Men_Devotee1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदीच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात. पण देशात अशी अनेक मंदिरं आहेत, जिथे पुरुषांना प्रवेश करण्याची परवानगी नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30054107/Men_Devotee1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदीच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात. पण देशात अशी अनेक मंदिरं आहेत, जिथे पुरुषांना प्रवेश करण्याची परवानगी नाही.
2/7
![त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक : एप्रिल 2016 पर्यंत नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. केवळ पुरुषांनाच शिवलिंगाचं दर्शन करता येत होतं. पण भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रयत्नांमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांनाही प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. परंपराही मोडणार नाही आणि समस्येवर तोडगाही निघेल, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30110104/Trimbakeshwar_Temple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक : एप्रिल 2016 पर्यंत नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. केवळ पुरुषांनाच शिवलिंगाचं दर्शन करता येत होतं. पण भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रयत्नांमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांनाही प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. परंपराही मोडणार नाही आणि समस्येवर तोडगाही निघेल, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
3/7
![माता मंदिर, मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील हे मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुलं असतं. पण एक काळ असा येतो की, यावेळी पुरुषांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असते. इतकंच नाही तर मुख्य पुजाऱ्यालाही यादरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी नसते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30110102/Mata_Temple_Muzaffarpur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माता मंदिर, मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील हे मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुलं असतं. पण एक काळ असा येतो की, यावेळी पुरुषांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असते. इतकंच नाही तर मुख्य पुजाऱ्यालाही यादरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी नसते.
4/7
![देवी कन्याकुमारी, तामिळनाडू : भगवती देवीच्या कुमारी रुपाला समर्पित हे मंदिर दक्षिण भारतात आहे. देशातील शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. देवी भगवतीच्या या रुपाला संन्यासी देवीच्या रुपातही ओळखलं जातं. त्यामुळेच या मंदिराच्या गाभाऱ्यात विवाहित पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30110100/Devi_Kanyakumari_Temple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवी कन्याकुमारी, तामिळनाडू : भगवती देवीच्या कुमारी रुपाला समर्पित हे मंदिर दक्षिण भारतात आहे. देशातील शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. देवी भगवतीच्या या रुपाला संन्यासी देवीच्या रुपातही ओळखलं जातं. त्यामुळेच या मंदिराच्या गाभाऱ्यात विवाहित पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे.
5/7
![चक्कूलातुकावू मंदिर, अलापुझा : केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील चक्कूलातुकावू मंदिरात दरवर्षी पोंगल हा खास उत्सव साजरा केला जातो, ज्या महिला भाविक सहभागी होतात. हा कार्यक्रम सुमारे एक आठवड्यापर्यंत सुरु असतो. याला नारी पूजा नावाने ओळखलं जातं. यादरम्यान इथे पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई असते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30110057/Chakkulathukavu_Bhagavathy_Temple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चक्कूलातुकावू मंदिर, अलापुझा : केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील चक्कूलातुकावू मंदिरात दरवर्षी पोंगल हा खास उत्सव साजरा केला जातो, ज्या महिला भाविक सहभागी होतात. हा कार्यक्रम सुमारे एक आठवड्यापर्यंत सुरु असतो. याला नारी पूजा नावाने ओळखलं जातं. यादरम्यान इथे पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई असते.
6/7
![ब्रह्म मंदिर, पुष्कर : पुष्करमधील ब्रह्म मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यास विवाहित पुरुष भक्तांना मनाई आहे. सरस्वती देवीच्या शापामुळे गाभाऱ्यात विवाहित पुरुषांना प्रवेश करता येत नाही, असा समज आहे. तसंच कोणीही विवाहित पुरुष ब्रह्माच्या दर्शनासाठी गर्भगृहात गेल्यास त्याच्या वैवाहिक आयुष्यात नकारात्मक परिणाम होतो, असं मानलं जातं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30110055/Brahma_Temple_Pushkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रह्म मंदिर, पुष्कर : पुष्करमधील ब्रह्म मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यास विवाहित पुरुष भक्तांना मनाई आहे. सरस्वती देवीच्या शापामुळे गाभाऱ्यात विवाहित पुरुषांना प्रवेश करता येत नाही, असा समज आहे. तसंच कोणीही विवाहित पुरुष ब्रह्माच्या दर्शनासाठी गर्भगृहात गेल्यास त्याच्या वैवाहिक आयुष्यात नकारात्मक परिणाम होतो, असं मानलं जातं.
7/7
![अट्टूकल मंदिर, तिरुअनंतपुरम : प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिरापासून केवळ दोन किमी अंतरावर असलेल्या पार्वती देवीच्या या मंदिरात दरवर्षी सुमारे 30 लाख महिला दर्शनासाठी येतात. हे मंदिर नारी सबरीमला नावानेही ओळखलं जातं. यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/30110052/Attukal_Temple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अट्टूकल मंदिर, तिरुअनंतपुरम : प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिरापासून केवळ दोन किमी अंतरावर असलेल्या पार्वती देवीच्या या मंदिरात दरवर्षी सुमारे 30 लाख महिला दर्शनासाठी येतात. हे मंदिर नारी सबरीमला नावानेही ओळखलं जातं. यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे.
Published at : 30 Jul 2016 11:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)