1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणीला मनाई करण्यात आली आहे.
2/7
होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली होती. तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला होता. त्यामुळे अनेकांनी शोरुमबाहेर गर्दी केली होती.
3/7
भारत स्टेज थ्री या इंजिनामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांवर बंदी घातली आहे. त्याऐवजी आजपासून फक्त भारत-४ इंजिन असलेल्या गाड्यांचीच विक्री होणार आहे.
4/7
पुणे, बुलडाणा, औरंगाबाद, मालेगाव, उस्मानाबाद, सोलापूर, वसई या ठिकाणी रेकॉर्डब्रेक गाड्यांची विक्री झाली. गेल्या नऊ दिवसात राज्यभरात 80693 दुचाकींची नोंदणी झाली आहे.
5/7
वाहनांवरील बंपर ऑफरनंतर राज्यातील प्रत्येक ठिकाणी शोरुममध्ये बरीच गर्दी दिसत होती. अनेक शोरुममध्ये तर ‘आऊट ऑफ स्टॉक’ अशा पाट्याही लावण्यात आल्या होत्या.
6/7
गाड्यांवरील ऑफरनंतर प्रतिदिवशी 8 ते 9 (सरासरी) नव्या गाड्यांची नोंदणी झाली. 30 मार्च 2017ला 13757 नव्या गाड्यांची नोंदणी झाली. तर 31 मार्च 2017 रोजी दुपारपर्यंत तब्बल 15211 गाड्यांची नोंदणी झाली. मात्र, अनेक शोरुम काल रात्री 12 पर्यंत सुरु असल्यानं हा आकडा 25 ते 30 हजारापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
7/7
सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्यानंतर वाहन कंपन्यांनी 31 मार्चपर्यंत या गाड्यांच्या विक्रीसाठी बंपर सूट दिली होती. या बंपर सूटनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाड्या खरेदी केल्या. त्यामुळे वाहनखरेदीत बरीच वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल 3 पट वाढ झाली.