एक्स्प्लोर
पंचगंगा पात्राबाहेर, चहूबाजूला पाणीच पाणी!
1/6

पंचगंगा नदीची पाणीपातळी गुरुवारी सकाळी सहा वाजता 31.8 फुटांवर होती. सकाळी नऊ वाजता ती 32 फूट, तर दुपारी चार वाजता 33 फुटांवर गेली. यानंतरही पाणीपातळी वेगाने वाढतच होती. सहा वाजता पाणी पातळी 33.6 फुटांवर गेली. सायंकाळी सात वाजता पातळी 34 फुटांपर्यंत गेली. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर आज पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. दरम्यान राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
2/6

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेचे पाणी इशारा पातळीकडे वाढत चालले आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर हा पाऊस कोसळत होता. शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीलाही पूर आला आहे. पंचगंगेचे पाणी गुरुवारी रात्री गंगावेस-शिवाजी पूल या रस्त्यापर्यंत आले होते.
Published at : 13 Jul 2018 08:11 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























