आज पहाटेपासून देव दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना ही सजावट आकर्षित करतेय.
2/5
सिद्धरामेश्वरांच्या समाधीला झालेली सजावट डोळे दिपवणारी आहे. सिद्धरामेश्वरांचं समाधी स्थळ फुलांनी सजवण्यात आलंय. झेंडूच्या फुलांची ही सजावट कमालीची नेत्रदीपक ठरलीय. येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी ही सजावट आकर्षण ठरतेयं.
3/5
दरवर्षी श्रावणी सोमवारी भाविकांकडून फुलांची आरास केली जाते. जवळपास सातशे किलो फुलांचा वापर करून ही नयनरम्य अशी सजावट करण्यात आलीय. वीस कारागिरांनी सलग तीन दिवस परिश्रम घेऊन ही सुंदर कलाकृती सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण केलीय.
4/5
देव दर्शनाच्या आत्मिक समाधानासोबत भाविकांना या सुंदर सजावटीचं नेत्रसुख मिळतंय. वेगवेगळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची ही आरास डोळ्यात मावत नव्हती.
5/5
श्रावणी सोमवारच्या पहिल्याच दिवशी राज्यातल्या अनेक शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्धरामेश्वर मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून गेलंय. श्रावणाचा पहिला सोमवार सोलापूरच्या शिवभक्तांसाठी प्रफुल्लित करणारा ठरला.