एक्स्प्लोर
वैवाहिक आयुष्यात दोन इनिंग खेळणारे क्रिकेटर्स!
1/7

विनोद कांबळीः भारताचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांनी वैवाहिक आयुष्यात दोन इनिंग खेळल्या आहेत. कांबळी यांनी 1998 साली नॉएला लुईस या हॉटेल रिसेप्शनिस्ट सोबत पहिला विवाह केला होता. मात्र दोघांचे संबंध बिघडल्याने कांबळी यांनी घटस्फोट घेतला. कांबळी यांनी नंतर एंड्रिया हॅविट नावाच्या तरुणीशी दुसरा विवाह केला.
2/7

दिनेश कार्तिकः भारतीय संघाचा विकेटकिपर खेळाडू दिनेश कार्तिक आपल्या खेळापेक्षा वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीचे नाव निकिता आहे. दोघे 2007 साली विवाहबद्ध झाले होते. मात्र 2012 साली त्यांनी घटस्फोट घेतला. भारताचा खेळाडू मुरली विजय हा दिनेश कार्तिकच्या घटस्फोटाचं कारण ठरला होता. मुरली विजय आणि निकिता यांच्यामध्ये जवळीक चांगलीच वाढली होती. हे प्रकरण एवढे वाढले की दिनेश कार्तिकने निकिताशी घटस्फोट घेतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने 2015 साली अॅथलेटिक दिपिका पल्लीकलशी दुसरं लग्न केलं.
Published at : 02 Jun 2016 08:46 PM (IST)
View More























