एक्स्प्लोर
क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या गाजलेल्या जोड्या

1/8

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. अत्यंत गुप्तपणे हा विवाह पार पाडण्याचा दोघांचा प्रयत्न होता.
2/8

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी 27 डिसेंबर 1969 रोजी तत्कालीन सर्वात तरुण कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्नगाठ बांधली. हा बॉलिवूड आणि क्रिकेटला जोडणारा कदाचित पहिलाच विवाह होता. अपघातात एक डोळा गमावल्यानंतर सत्तरच्या दशकात पतौडींनी क्रिकेट करिअर थांबवलं. शर्मिला-पतौडी यांना सैफ, सबा आणि सोहा ही तीन मुलं आहेत. 22 सप्टेंबर 2011 रोजी नवाब पतौडींचं निधन झालं. शर्मिला टागोर अद्यापही सिनेमात कार्यरत आहेत.
3/8

सलमान खानच्या बॉडीगार्डमध्ये झळकलेली ब्रिटीश अभिनेत्री हेझल कीच 30 नोव्हेंबर 2016 रोजी क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत विवाहबद्ध झाली. चंदीगढमधील गुरुद्वारामध्ये दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या.
4/8

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार विव रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. नीना गुप्ता यांना विवपासून मसाबा ही मुलगी आहे. मात्र विव विवाहित असल्यामुळे नीनासोबत त्याचं लग्न झालंच नाही. 2008 मध्ये दिल्लीचा सीए विवेक मेहरासोबत अखेर नीना गुप्ताने लग्नगाठ बांधली.
5/8

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री संगीता बिजलानीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केलं. पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिल्यानंतर 1996 मध्ये संगीता-अझर विवाहबद्ध झाले. नौरीनपासून अझरला दोन मुलंही होती. अझर मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकल्यानंतर दोघं वेगळे झाले.
6/8

'चक दे इंडिया' आणि 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे 23 नोव्हेंबर 2017 रोजी माजी क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्नबंधनात अडकली. 2014 मध्ये झहीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून तो टी20 सामने खेळत राहिला.
7/8

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री फरहीन खानने ऑल राऊंड क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत 1997 मध्ये लग्न केलं. फरहीनचे जान तेरे नाम, सैनिक यासारखे सिनेमे गाजले आहेत.
8/8

क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांची ओळख आयपीएलमध्ये कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. गीता बसराने द ट्रेन, दिल दिया है, लॉक यासारख्या हिंदी आणि पंजाबी चित्रपटात भूमिका केल्या. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर 29 ऑक्टोबर 2015 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले. गीता-भज्जीला हिनाया ही दीड वर्षांची मुलगी आहे.
Published at : 11 Dec 2017 09:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
पुणे
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
