एक्स्प्लोर
99 ते 888 रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन
1/4

जयपुरच्या Docoss या कंपनीने Docoss X1 हा फोन लाँच केला आहे. Docoss X1 मध्ये 4 इंचचा डिस्प्ले आणि 1.2 GHz प्रोसेसर आहे. तर 1 GB रॅमसह 4GB इंटर्नल मेमरी दिलेली आहे, जी 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. या फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा तर 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र या फोनच्या विक्रीबाबत कंपनीने अद्याप कसलीही माहिती जाहीर केलेली नाही. याची किंमत 888 रुपये आहे.
2/4

अच्छे दिनः बंगलोरच्या नमोटेल या कंपनीने देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याचं जाहीर केलं आहे. अच्छे दिन या स्मार्टफोनची किंमत केवळ 99 रुपये असणार आहे. या फोनमध्ये 480x800 रिझोल्युशन असणारा 4 इंचचा डिस्प्ले, 5.1 OS लॉलीपॉप आणि 1 GB रॅम असे फिचर्स असणार आहेत. याशिवाय या फोनमध्ये 4 जीबीची इंटर्नल मेमरी असेल जी 32 GB पर्यंत वाढवता येईल. 2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असणार आहे तर VGA सेल्फी कॅमेरा असणार आहे.
Published at : 01 Jun 2016 06:58 PM (IST)
Tags :
Freedom 251View More























