मुख्यपृष्ठPhotos'चला हवा येऊ द्या' मधील हा कलाकार अडकणार लग्नाच्या बेडीत
'चला हवा येऊ द्या' मधील हा कलाकार अडकणार लग्नाच्या बेडीत
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Jan 2019 11:39 AM (IST)
1/13
सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस ,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या दमदार नाटकात त्याने भूमिका साकारल्या आहेत.
2/13
अंकुर एक उत्तम अभिनेता असून तो एक उत्तम कवी देखील आहे. त्याच्या 'पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी' या कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
3/13
विदर्भातील पुसदसारख्या भागातून येऊन आज चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे अंकुर वाढवे
4/13
शरीराची उंची जरी कमी असली तरी त्याच्या अभिनयाच्या उंचीचे कौतुक अनेक दिग्गज अभिनेत्यांनी केले आहे.
5/13
अंकुर हा उच्चशिक्षित असून त्याने अमरावती विद्यापीठातून एमए मराठी तर मुंबई विद्यापीठातून मास्टर्स इन थिएटर्स केले आहे. अंकुरला कॉलेजात असल्यापासून नाटकाची आवड होती. 'सर्किट हाऊस' हे अंकुरचं पहिलं व्यावसायिक नाटक.
6/13
चला हवा येऊ द्या या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील एक महत्वाचं पात्र आहे अंकुर वाढवे.
7/13
डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, योगेश सिरसाट या विनोदी कलाकारांसह अंकुर देखील या शोचा महत्वाचा भाग बनला आहे.
8/13
करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस ,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या दमदार नाटकात त्याने भूमिका साकारल्या आहेत.
9/13
अंकुरला अभिनयासोबत सामाजिक भान देखील आहे. सामाजिक कार्यात तो नेहमी पुढे असतो.
10/13
'जलसा' या मराठी चित्रपटालाही तो एक भाग बनला. पुढे चला हवा येऊ द्या मध्ये छोटूच्या भूमिकेसाठी त्याची वर्णी लागली आणि अंकुर प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचला.
11/13
अंकुर वाढवे एक उत्तम अभिनेता असून तो एक उत्तम कवी देखील आहे. त्याच्या 'पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी' या कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
12/13
नुकताच अंकुरचा साखपुडा झाला असून लवकरच तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
13/13
चला हवा येऊ द्या या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील एक महत्वाचं पात्र आहे अंकुर वाढवे.