रितेश देशमुखः भारतीय आर्मीचा अभिमान वाटतो. सरकारने दहशतवादाविरोधात हे कडक पाऊल उचलल्याबद्दल अभिनंदन, असं रितेशने म्हटलं आहे.
2/7
भारतीय लष्कराने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी ऑपरेशनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांचं देशभरातून कौतुक होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही भर टाकली आहे.
3/7
अमिताभ बच्चनः भारतीय आर्मीसोबत पंगा घेऊ नका, असा इशारा बिग बींनी दिला आहे.
4/7
शाहरुख खानः दहशतवाद्यांना धडा शिकवल्याबद्दल भारतीय लष्कराचे आभार.. जवानांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे, असं शाहरुखने म्हटलं आहे.
5/7
सनी देओलः दहशतवाद्यांना जशाच तसंच उत्तर देत आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांना सनी देओलने सलाम केला आहे.
6/7
वरुन धवनः भारत सरकारचं अभिनंदन.. दहशतवाद्यांना धडा शिकवल्याबद्दल भारतीय आर्मीचा अभिमान वाटतो, असं वरुनने म्हटलं आहे.
7/7
अक्षय कुमारः दहशतवादाविरोधातील हे कठीण ऑपरेशन यशस्वी पार पाडल्याबद्दल भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो. सरकारने हा धाडसी निर्णय घेण्याची हीच वेळ होती, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.