एक्स्प्लोर
बर्थ डे स्पेशलः कुंबळेमुळे हरभजनचे येऊ शकतात 'अच्छे दिन'

1/7

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड झाली आहे. शिवाय कसोटी कर्णधार विराट कोहली आणि हरभजन यांचंही चांगलं नातं आहे. त्यामुळे हरभजनचं भारतीय संघात पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं, असा अंदाज लावला जात आहे.
2/7

वन डेमध्ये देखील अशीच स्थिती आहे. हरभजनला 2011 नंतर वन डे सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर हरभजनने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला आहे.
3/7

अनिल कुंबळे आणि कपिलदेवनंतर हरभजन भारताच्या गोलंदाजांमध्ये हरभजनचा क्रमांक लागतो. हरभजनने आतापर्यंत 471 विकेट घेतल्या आहेत, तर कपिलदेव 434 आणि अनिल कुंबळेच्या नावावर सर्वात जास्त 619 विकेट आहेत.
4/7

अनिल कुंबळे आणि हरभजन यांच्या जोडीनेच 2001 साली ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाला धूळ चारली होती.
5/7

ऑस्ट्रेलियासोबत 2013 साली कसोटी खेळल्यानंतर हरभजनला संघात जागा मिळाली नव्हती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध हरभजनला पुन्हा संधी देण्यात आली. मात्र चांगल्या प्रदर्शनानंतरही हरभजनला पुन्हा संधी मिळाली नाही.
6/7

भारताचा फिरकीपटु हरभजन सिंह आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. हरभजनने 103 कोसोटी सामन्यांमध्ये 417 विकेट घेतल्या आहेत. तर 236 वन डे सामन्यांमध्ये 269 विकेट घेतल्या आहेत. बऱ्याच काळापासून संघाबाहेर असलेल्या टीम इंडियाच्या या स्टारला आता अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
7/7

भारताच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे विराजमान झाल्यानंतर हरभजनच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे. कुंबळे आणि हरभजन या फिरकीपटुंच्या जोडीने भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. कुंबळेच्या पावलावर पाऊल टाकतच हरभजनने भारताला अनेक महत्वाचे विजय मिळवून दिले आहेत.
Published at : 03 Jul 2016 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
