एक्स्प्लोर
बिग बॉस 10: मोनालिसाचा बेली डान्स आणि ओम स्वामींची टीप्पणी
1/12

नॉमिनेशनपासून बचाव करण्यासाठी तरुणांना आकर्षित करत आहे, अशी टीप्पणीही ओम स्वामींनी यावेळी केली.
2/12

3/12

काल जेव्हा मोनालिसाने 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी' या गाण्यावर डान्स केला, तेव्हा ओम स्वामी तिला आपल्या खासगी खोलीतून पाहात होते. यानंतर ओम स्वामींनी हा प्रकार पाहून, ''उतार वयात तारुण्य कुठून आले?'' असा प्रश्न मोनालिसाला विचारला. इतकेच नाही, तर मेकअप करुन तरुण होता येत नाही, अशी टीप्पणीही केली.
4/12

विशेष म्हणजे, यानंतर ओम स्वामीही स्वत: उभे राहून मोनालिसाकडे पाहात बेली डान्स करण्याचा प्रयत्न करु लागतात.
5/12

6/12

बिग बॉसच्या घरात रोज नवी नाती जोडली जातात, आणि झटक्या सरशी तुटतात. असेच काहीसे प्रकार बिग बॉसच्या चालू पर्वातील सर्वात चर्चित जोडी ओम स्वामी आणि मोनालिसा यांच्याबाबतीत घडले. जे ओम स्वामी मोनालिसाला आपली मुलगी मानत होते, आता तेच तिच्यावर टीका करत आहेत.
7/12

ओम स्वामी काही दिवसांपूर्वी मोनालिसासोबत बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पुलमध्ये पोहताना दिसले होते.
8/12

9/12

यावेळचे इतरही काही फोटो...
10/12

मोनालिसा बेली डान्स येत नसल्याचे सांगते, पण तिला डान्स करताना पाहून ओम स्वामी म्हणतात की, ''हे पाहा, ही काय करते. उतारवयात हे सर्व योग्य आहे का? कसले लोक आहेत जे अशा मुलीला मतदान करतात''
11/12

वास्तविक, ओम स्वामींना सध्या बिग बॉसच्या घरातून बाहेर काढून एका खासगी खोलीत ठेवण्यात आलं आहे. या खोलीतूनच ते टिव्हीच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरातील सर्व हलचालींवर नजर ठेऊन आहेत.
12/12

यावर मोनालिसाने बऱ्याच दिवसांपासून आपण अभिनय केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पण त्यावरही ओम स्वामींचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा तिच्यावर टीका करताना इथे काय करतेस, असा प्रश्न केला.
Published at : 08 Nov 2016 03:42 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















