सलमानच्या चाहत्यांच्या अशा ट्वीटनंतर सोनानं त्यांनाही उत्तर दिलं आहे. "भाईंच्या चमच्यांनो तुमच्या प्रत्येक अतिशय घाणेरड्या कमेंटने मी म्हटलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचं स्पष्ट झालं आहे.'
2/6
तिच्या ट्विटनंतर सलमानच्या चाहत्यांनी ट्विटरवर तिला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आणि तिच्याबाबत अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.
3/6
गायिका सोना मोहापात्रा ट्वीट केल्यानंतर सलमानचे चाहते तिच्यावर चांगलेच भडकले.
4/6
सलमानच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोना मोहापात्राने ट्वीट केलं की' "बायकांना मारहाण, लोकांना चिरडणं, जनावरांची हत्या करणं... तरीही तो (सलमान) देशाचा हिरो. हे बरोबर नाही. भारतात असा वेड्या चाहत्यांची कमी नाही.
5/6
सलमानविरोधात ट्विट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी गायिका सोना मोहापात्राला ट्विटरवर बरंच हैराण केलं आहे. सलामाननं बलात्कारसंबंधी वक्तव्य केल्यानं सोना मोहापात्रानं ट्विटरवरुन त्याच्यावर टिका केली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तिला बरंच ट्रॉल केलं.
6/6
नुकतंच सलमान खानला सुल्तान सिनेमच्या शुटींगबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना सलमाननं शुटींगनंतर येणारा थकवा हा एखाद्या बलात्कारी तरुणीच्या वेदनेइतका असल्याचं म्हटलं होतं.